राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांना अर्धे अभ्यासक असं म्हटलं आहे. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरही अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे. प्रभू रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून आपलं शिबिर चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्याने श्रीराम मांसाहारी होते हे सिद्ध करावं असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसंच जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख अर्धे अभ्यासक असा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे अमोल मिटकरी यांची पोस्ट?

‘श्री रामचरितमानस अयोध्या कांड दोहा नंबर ८९ चौपाई श्रृंगवेरपूर जब प्रभू श्री राम कंदमूल, फल खाकर पेड के निचे विश्राम किये’ असा उल्लेख असलेला फोटो अमोल मिटकरींनी पोस्ट केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी फक्त प्रसिद्धी मिळावी म्हणून हे वक्तव्य केलं आहे असं अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे आनंद परांजपे यांनी?

“जितेंद्र आव्हाड हे स्वतःला इतिहासाचे संशोधक मानतात. त्यांनी प्रभू रामचंद्राविषयी अभद्र वक्तव्य केलं आहे. प्रभू श्रीराम मांसाहार करत होते. १४ वर्षे राम वनवासात असताना त्यांनी मांसाहार केला आणि त्यांचाच आदर्श ठेवून आम्हीही मांसाहार करतो असं त्यांनी म्हटलं. मला माझ्या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे जे प्रभू रामाची महाआरती करायला गेले होते. मी पोलिसांचाही निषेध करतो, कारण त्यांनी आंदोलन केलं नाही तर महाआरती केली. जितेंद्र आव्हाड कायमच हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात. आता पोलीस ठाण्यात FIR दाखल झाला नाही तर वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर महाआरती करणार आहोत.” असं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- ‘राम मांसाहारी होता’, वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम, म्हणाले; “वाल्मिकी रामायणातला तो उल्लेख…”

जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य काय?

राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार?”, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीतील शिबिरात उपस्थित केला. तसेच शिबिरानंतर माध्यमांनी आव्हाड यांना पुन्हा एकदा या विषयावर बोलते केले. तेव्हा ते म्हणाले, “मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. मी माझ्या विधानावर ठाम आहे. श्रीरामाला शाकाहारी बनविले जात आहे. पण वनवासात असताना ते काही मेथीची भाजी खात होते का? या देशातील ८० टक्के लोक मांसाहारी असून ते राम भक्त आहेत”, असेही आव्हाड म्हणाले होते.