Amol Mitkari : “दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबाबत सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर, टोल नाका असेल किंवा भोंग्यांचे आंदोलन असेल, असं कोणतेही आंदोलन यशस्वी करू शकलेले नाही”, अशी टीका अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल केली होती. त्यांच्या या टीकेचे पडसाद आज उमटले असून मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर आज अकोला येथे हल्ला केला आहे. या हल्ल्याला मी भीक घालत नाही, अशी प्रतिक्रियाही अमोल मिटकरी यांनी आज दिली. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
“महाराष्ट्राचं नाव घेतात आणि अशाप्रकारे गुंडागर्दी करतात. हा भेकड हल्ला आहे. या हल्ल्यांना मी घाबरत नाही”, असं अमोल मिटकरी म्हणाले. “या हल्ल्यावेळी मी विश्रामगृहात होतो. काही जण मला भेटायला आले होते. त्यासाठी मी येथे आलो होतो. मनसेच्या कार्यकर्त्याने हा हल्ला केला. मी याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार आहे”, असा इशाराही त्यांनी दिला.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या कराच्या काचा फोडल्या आणि प्रचंड घोषणाबाजी केली. याबाबत अमोल मिटकरी म्हणाले की, मी कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. माझं वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. पण कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. आपण कायदेशीर कारवाई करू, असंही ते म्हणाले.
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते?
“सुपारी बहाद्दर लोकांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे. त्यांनी नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात कुठं तरी भेट दिली आहे. ज्यांना साधा एनडीआरएफचा फुलफॉर्म माहिती नाही, त्यांनी आपत्ती व्यवस्थापनावर बोलावं, हा अलीकडच्या राजकारणातला सर्वात मोठा विनोद आहे”, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला होता.
राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं होतं?
“धरणातील पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडलं जाणार याची कल्पनाही लोकांना नव्हती. त्यामुळे अनेक लोकांच्या घरात पाणी शिरलं. मला वाटतं की राज्य सरकारने या सर्व गोष्टीचा विचार करायला हवा. मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला. मात्र, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. गेले अनेक वर्ष हे मी सांगतो आहे त्याचंच हे चित्र आहे. प्रत्येकवेळी राज्य सरकारकडून डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट नसते”, असं ते म्हणाले.
म