अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून काही आमदारांना बरोबर घेत भाजपा-शिंदे गटाच्या सरकारमध्ये प्रवेश केला आहे. अजित पवार यांनी रविवारी (२ जून) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला आहे. दरम्यान, आज अजित पवारांच्या गटाने जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवलं आहे, तर त्यांच्याऐवजी खासदार सुनिल तटकरे नवे प्रदेशाध्यक्ष असतील, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. तसेच आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पक्षात वेगवेगळ्या पदांवर पक्षातील विविध नेत्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. आज (३ जुलै) सायंकाळी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी एबीपी माझाशी बोलताना आमदार मिटकरी म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले. परंतु कोरोनामुळे पहिले दोन वर्ष आमच्या आमदारांना निधीच मिळाला नाही. परत शिंदे-फडणवीस सरकार आलं, त्यानंतर आमच्या आमदारांच्या कामावर स्टे आले.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा अजित पवार अर्थमंत्री होते तेव्हा स्थानिक आमदार विकास निधी दोन कोटींवरून पाच कोटी रुपये इतका वाढवला. परंतु आमच्या सर्व आमदारांना असं वाटत होतं की, त्यांच्या मतदारसंघात कामं व्हावी. केंद्रातल्या सरकारचं आम्हाला पाठबळ मिळावं.

हे ही वाचा >> राष्ट्रवादीत किती आमदार उरले? जयंत पाटलांनी सांगितली नेमकी आकडेवारी

अमोल मिटकरी म्हणाले, आमच्या सर्व आमदारांना असं वाटत होतं की, पुढच्या निवडणुकांना सामोरं जाण्याआधी आपल्या मतदारसंघांमध्ये कामं व्हायला पाहिजेत. त्याशिवाय लोक कसे काय आपल्याला निवडून देतील. त्यामुळे हा आमदारांनी सांगितलेला निर्णय (भाजपाबरोबर जाण्याचा) आहे. हा निर्णय एकट्या अजितदादांनी घेतलेला नाही. त्यांनी आमदारांच्या इच्छेमुळे हा निर्णय घेतला आहे.