राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून अजित पवारांनी भाजपाबरोबर संसार थाटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ४० हून अधिक आमदारांना आपल्याबरोबर घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट बनवला आणि या गटासह ते महायुतीत सहभागी झाले आहेत. २ जुलै २०२३ रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हापासून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे. कधी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते, पदाधिकारी दावा करतात, तर कधी पक्षाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी तसे होर्डिंग्स लावतात, यासह कधी-कधी ठाकरे गट आणि काँग्रेस नेते दावा करतात की अजित पवार मुख्यमंत्री होण्यासाठी तिकडे (महायुतीत) गेले आहेत. दरम्यान, अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अकोल्यातील एका कलाकाराने २०२४ चा संकल्प मांडणारी एक रांगोळी काढली आहे. या रांगोळीचा व्हिडीओ अमोल मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. अजित पवार यांना २०२४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवणे हा संकल्प या रांगोळीद्वारे जाहीर करण्यात आला आहे. या रांगोळीचा व्हिडीओ शेअर करत मिटकरी यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावे ही सर्वसामान्यांची भावना आम्ही यावर्षी प्रत्यक्षात उतरवू. या संकल्पासह ‘घड्याळ तेच वेळ नवी’ आणि ‘अजितपर्व’ असा हॅशटॅगही मिटकरी यांनी वापरला आहे.

रांगोळीत अजित पवारांचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याखाली लिहिलं आहे की, मी अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…लवकरच…२०२४…घड्याळ तेच वेळ नवी, नव्या वर्षाचा नवा संकल्प, २०२४ हे नववर्ष महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारं ठरेल ही सर्वसामान्यांची भावना आहे.

हे ही वाचा >> महाराष्ट्रातला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्टीकरण देत म्हणाले…

चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एका कार्यक्रमात म्हणाले होते की, “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होतील. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांचा शपथविधी होईल.” त्यावर प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी म्हणाले होते, “नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे बावनकुळेंचा आत्मविश्वास वाढणं साहजिक आहे. पण, २०२४ साली अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, अशी आमची भावना आहे. मात्र, लोकशाहीत भावनेला अर्थ नसतो. ज्याचे जास्त आमदार, त्या पक्षाचा मुख्यमंत्रीपदावर दावा असतो.”