राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या ४० आमदारांसह सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात वेगवेगळे दावे वेगवेगळ्या पक्षांकडून, नेत्यांकडून केले जात आहेत. काही नेते दावा करत आहेत की, अजित पवार लवकरच भाजपात जातील. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही अजित पवारांचा निर्णय मान्य असेल अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्यामुळे या सगळ्या चर्चेत तेल ओतलं गेलं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमोल मिटकरी हे अजित पवारांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या या चर्चांवरील वक्तव्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे. मिटकरी म्हणाले की, “अजित पवारांबाबत ज्या चर्चा सुरू आहेत त्या मिथ्या आहेत. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच स्पष्ट केलं आहे की, ‘सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करतंय.”

हे ही वाचा >> “राष्ट्रवादीत सध्या ढगाळ वातावरण, लवकरच…”, अजित पवारांबाबत गुलाबराव पाटलांचं सूचक वक्तव्य

आमदार अमोल मिटकरी म्हणाले की, भाजपाकडून या कांड्या पिकवल्या जातायत तर ते तपासलं पाहिजे. एका वर्तमान पत्राच्या बामीवर चर्चा घडवणं योग्य नाही. अजित दादांना ठरवून टार्गेट केलं जातंय का याची शहानिशा व्हायला हवी. भाजपाचे लोक तोंडसूख घेत असतील तर त्यांना घेऊ दे. रवी राणांसारख्या लोकांना बोलू देत. परंतु या चर्चेत तथ्य नाही. दादा उपमुख्यमंत्री होते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि गटनेते आहेत. त्यामुळे दादा जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्यच असेल. पण दादा भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतील हे कोणी सांगितलं. दादा पवारसाहेबांच्या शब्दाबाहेर जातील असं तुम्हाला वाटतं का? त्यामुळे या सर्व चर्चा केवळ मिथ्या आहेत.