तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष केसीआर म्हणजेच के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे औचित्य साधून के. चंद्रशेखर राव हे त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन पंढरपूरला येत आहेत. त्यांचा दौरा अधिकृतपणे निश्चित झाला आहे. चंद्रशेखर राव हे आपल्या मंत्रिमंडळ आणि सहकारी आमदार-खासदारांसह २७ जून रोजी सकाळी हैदराबाद येथून मोटारीने सोलापूरकडे रवाना होतील. वाटेत उमरगा येथे भोजन घेऊन सायंकाळी सहा वाजता सोलापुरात पोहोचतील.

दरम्यान, के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी-कार्यकर्ते त्यांच्या स्वागताची तयारी करत आहे. राव यांच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात त्यांच्या स्वागताचे होर्डिंग्स लावले आहेत. तसेच आमदार, खासदार यांच्या निवासाची व्यवस्था केली आहे.

Rain Maharashtra, Rain in Diwali, Rain,
फटाक्यांच्या मोसमात पावसाची आतषबाजी, महाराष्ट्रात पुन्हा…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
Ramdas Athawale
Ramdas Athawale : “महायुतीने आमचा विचार केला नाही”, रामदास आठवलेंनी व्यक्त केली नाराजी; मुंबईतील ‘या’ जागेची मागणी!
Sumeet Raghvan on toll free
Sumeet Raghvan : “आम्हाला टोलमाफीचं गाजर नको, त्यामुळे…”, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत सुमीत राघवनने व्यक्त केला संताप!
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
Terrorism started by gangs in Pune crime news Pune news
निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्याकडून दहशतीचे प्रकार – वारजे, पर्वती, चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Rohit Pawar
Rohit Pawar : खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींची रक्कम जप्त, रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; म्हणाले, “लक्षात ठेवावं…”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोर मिटकरी यांनी एक ट्वीट करत केसीआर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मिटकरी यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यापैकी पहिल्या फोटोत एका इमारतीबाहेर केसीआर यांच्या स्वागाताचे बॅनर लावले आहेत. तिथे सुरक्षारक्षकही तैणात करण्यात आले आहेत. यावरून असं दिसतंय की, या ठिकाणी बीआरएसच्या पदाधिकाऱ्यांची अथवा नेत्यांच्या निवासाची व्यवस्था केली असावी. तर दुसऱ्या फोटोत पातेलेभरून मटणाचा फोटो आहे. यासह मिटकरी यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, मटनाचा शाही बेत! पंढरीच्या वारीवर असताना मुख्यमंत्री केसीआर यांना हा प्रकार शोभतो का? वारकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका? पंढरपूरला येताना १० हजार वेळा विचार करा. पंढरीची वारी पवित्र आहे आपल्या अश्या वागण्याने अपवित्र करू नका.

याविषयी लोकसत्ता ऑनलाईनने अमोल मिटकरी यांच्याशी बातचित केली. यावेळी अमोल मिटकरी म्हणाले, केसीआर पंढरपूरला येत आहेत. वाटेत ते तेलंगणाहून पंढरपूरला येताना धाराशिवमधील उमरगा येथे थांबतील. तिथे हा मटणाचा बेत आखण्यात आला आहे. तिथे मटणाची पार्टी करून ते रात्री सोलापूरला मुक्कामी असतील. मुळात कोणी काय खावं, काय प्यावं यावर आमचं काही मत नाही. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु ते सोलापूर मुक्कामी असताना, एकीकडे अबकी बार किसान सरकार हे होर्डिंग त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. वेलकम टू महाराष्ट्र असे होर्डिंग्स लावले आहेत. या होर्डिंग्सवर पांडुरंगाची लावलेली प्रतिमा पाहून वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत.

अमोल मिटकरी म्हणाले, त्यांनी (बीआरएस) अवश्य मटणाचा बेत करावा, दारुचा बेत करावा, त्यावर आमचं काहीच मत नाही. आपले वारकरी दारू आणि मटणाला (मांसाहार) निषिद्ध मानतात. या महाराष्ट्राला वारीची मोठी परंपरा आहे. त्यामुळे त्यांनी वारकऱ्यांच्या भावनांशी कृपा करून खेळू नये. जर असं काही केलं तर उद्या तरी त्यांनी पथ्य पाळावं. उद्या त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना येताना आणि जाताना मटणाचा बेत करण्यापासून दूर ठेवावं. आमच्या वारकऱ्यांच्या भावना समजून घ्याव्यात. अन्यथा वारकरी ही गोष्ट लक्षात ठेवतील.

हे ही वाचा >> “आदरणीय पवारसाहेब, पोरकट…”, चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवारांना खोचक प्रत्युत्तर!

अमोल मिटकरी यांनी सांगितलं की, आमच्या कार्यकर्त्यांनी मला तिथले फोटो पाठवले आहेत. त्यामुळे मी ते ट्वीट केले आहेत. तसेच मी त्यांना विनंती केली आहे की, कृपा करून मटणाचा बेत केलाय तो रद्द करावा.