Amol Mitkari On MNS : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी (३० जुलै) अकोल्यामध्ये मिटकरींच्या कारवर हल्ला केला. त्यानंतर रात्रीपर्यंत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याला पोलिसांनी पकडलेलं नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोल्यात मोर्चा काढणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं. मिटकरी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांसी संवाद साधला. यावळी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेले आमचे काही लोक, माझा मित्र परिवार आज मोर्चा काढणार आहे. पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने हा मोर्चा निघेल. कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

अमोल मिटकरी म्हणाले, या मोर्चाद्वारे आम्ही एकच मागणी करणार आहोत की काही गुंडांनी काल आमच्यावर भ्याड हल्ला केला. त्यामधील ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे त्यांना तातडीने अटक व्हावी. काल रात्री उशिरापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाले होते. ते रुग्णालयात दाखल का झाले? ते स्वतः तिकडे गेले की त्यांना पाठवलं हे माझ्यापुढे असलेलं मोठं कोडं आहे.

Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण
Alia Bhatt Viral Video
तोंडाला मास्क, साधा लूक…; आलिशान गाडी सोडून आलिया भट्टचा रिक्षाने प्रवास; व्हिडीओ व्हायरल
Iltija Mufti news
Iltija Mufti : “हिंदुत्व हा एक आजार, कारण..”; रतलामचा व्हिडीओ पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य
Anjali Damania Statement
Anjali Damania : अजित पवारांचं नाव घेत अंजली दमानियांची टीका, “माझ्या तळपायाची आग मस्तकात..”
Abu Asim Azmi
Abu Azmi : “कोण विरोधक? त्यांनी आम्हाला…”; अबू आझमींचे मविआतून बाहेर पडण्याचे संकेत? आमदारकीची शपथही घेतली

अजित पवार गटातील आमदार म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे मुख्य आरोपी पंकज साबळे हा नियमित व्यायामशाळेत, तब्येतीची काळजी घेणारा माणूस आहे. त्याचा रक्तदाब वाढण्याचा काही संबंधच येत नाही. परंतु, पोलिसांनी त्याला रुग्णालयात का पाठवलं हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय आहे. आत्ता तात्पुरती अटक करावी, नंतर थातूर-मातुर पुराव्यांसह न्यायालयासमोर हजर करावं, त्यानंतर त्यांना जामीन मिळवून द्यावा, असा अंतर्गत कट रचला गेला आहे का हे मला माहिती नाही. त्यामुळे आमच्या पक्षाची मागणी आहे की सर्व आरोपींना अटक व्हावी.

हे ही वाचा >> Eknath Shinde : “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना चिमटा; म्हणाले, “त्यांना स्वतःवर…”

मुख्य आरोपी अद्याप फरार : मिटकरी

अमोल मिटकरी म्हणाले, दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी एका आरोपीला अटक होईल, त्यासाठी पोलिसांचं एक पथक रवाना झालं आहे. परंतु, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. ज्याने चिथावणीखोर व्हिडीओ बनवून शेअर केला तो कर्णबाळा दुनबळे पोलिसांच्या कचाट्यात सापडलेला नाही. ‘मिटकरीला संपवा’, असं म्हणणाऱ्या कर्णबाळाला पोलिसांनी अद्याप का पकडलं नाही? असा प्रश्न मला पडला आहे.

Story img Loader