Amol Mitkari On MNS : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी (३० जुलै) अकोल्यामध्ये मिटकरींच्या कारवर हल्ला केला. त्यानंतर रात्रीपर्यंत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याला पोलिसांनी पकडलेलं नाही, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोल्यात मोर्चा काढणार असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं. मिटकरी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांसी संवाद साधला. यावळी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेले आमचे काही लोक, माझा मित्र परिवार आज मोर्चा काढणार आहे. पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली शांततेच्या मार्गाने हा मोर्चा निघेल. कायदा व सुव्यवस्था बाधित होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा