Amol Mitkari React on Rohit Pawar Meets Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२५ नोव्हेंबर) कराड येथील प्रीतीसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. यावेळी अजित पवार व कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली. या भेटीवेळी रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले. त्यानंतर अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास” असं म्हणाले. दरम्यान, अजित पवारांनी कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे (रोहित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले भाजपाचे उमेदवार) यांच्या प्रचारासाठी सभा घेतली असती, एखाद्या सभेला संबोधित केलं असतं किंवा प्रचार केला असता तर रोहित पवार पराभूत झाले असते असं स्वतः राम शिंदे म्हणाले आहेत. यावर रोहित पवार म्हणाले, “कदाचित उलटा निकाल लागला असता. मात्र, अजित पवार बारामतीत अडकून पडले होते”.
“रोहित पवार अजित पवारांचे पाय धरून म्हणालेले, काका माझ्या…”, मिटकरींचा टोला; म्हणाले, “खोटारडा आज मस्तीत…”
Amol Mitkari on Rohit Pawar : रोहित पवार म्हणाले होते, "अजित पवार बारामतीत अडकून पडल्यामुळे त्यांना कर्जत-जामखेडला येता आलं नाही".
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-11-2024 at 15:23 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
TOPICSनिवडणूक २०२४Electionमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Maharashtra Vidhan Sabha Election 2024रोहित पवारRohit Pawarविधानसभा निवडणूक २०२४Assembly Election 2024
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari says rohit pawar requests ajit pawar dont campaign in karjat jamkhed assembly constituency asc