एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीला असताना शहाजीबापू पाटील यांचा ‘काय डोंगार..काय झाडी.. काय हाटेल’ हा संवाद तुफान व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी किंवा चिमटे काढण्यासाठी या संवादाचा पुरेपूर वापर करण्यात आला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हाच संवाद वापरून शिंदे सरकारमधील एक मंत्री तानाजी सावंत यांना लक्ष्य करत खोचक ट्वीट केलं आहे. यासोबत अमोल मिटकरींनी तानाजी सावंत यांच्या २६ ऑगस्ट २०२२ रोजीच्या दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका शेअर केली आहे. ही कार्यक्रम पत्रिका आता व्हायरल होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तानाजी सावंत यांच्या दौऱ्यावरून टोला!

अमोल मिटकरींनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुणे दौऱ्याची कार्यक्रम पत्रिकाच शेअर केली आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्या २६ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट यादरम्यानच्या पुणे दौऱ्याचं नियोजन नमूद करण्यात आलं आहे. यामध्ये तानाजी सावंत २६ तारखेला दुपारी अडीच वाजता मंत्रालयातून पुण्याच्या दिशेने निघाले असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र, त्यानंतर २७ आणि २८ ऑगस्ट या दोन दिवसांत तानाजी सावंत यांच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये फक्त निवासस्थान ते कात्रज, बालाजी नगर येथील कार्यालये असाच प्रवास नमूद करण्यात आला आहे.

पुण्यातील निवासस्थानातूनच तानाजी सावंतांचा चार जिल्ह्यांचा दौरा

तानाजी सावंत यांच्या या दौऱ्यावरून आता ट्रोलिंग सुरू झालं असून अमोल मिटकरींनी या दौऱ्याच्या नियोजन पत्राचा फोटो शेअर करत खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “हे आहेत आमचे आरोग्यमंत्री! एकट्या पुणे शहरात एकाच दिवसात हजारो किलोमीटरचा दौरा करण्याचा नवा विक्रम!! काय ते मंत्री? काय त्यांचं नाव? आणि काय त्यांचा दौरा? एकदम ओक्के ओक्के”, असं आपल्या ट्वीटमध्ये मिटकरींनी नमूद केलं आहे.

तानाजी सावंत यांच्या या दौऱ्याचं नियोजन पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.