Amol Mitkari on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. अवघ्या आठ महिन्यांतच हा पुतळा कोसळल्यामुळे या घटनेवरुन विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. या पुतळ्यावरून सत्ताधारी व विरोधकांमधील राजकारण तापलेलं असताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील आमदार (विधान परिषद) अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी या पुतळ्यातील त्रुटीवरून शिल्पकार जयदीप आपटेवर संताप व्यक्त केला आहे.

मिटकरी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटलं आहे की “आपटे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर या शिल्पात खोप का दाखवली? या मागचा इतिहास काय आहे? हे सर्व ठरवून केलंय का? की याच भरवशावर कंत्राट मिळवलं? जबाब तो देना पडेगा”.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”
Shabana Azmi
“वाईट कलाकार हे वाईट कलाकारच असतात”, शबाना आझमींचे स्पष्ट वक्तव्य; म्हणाल्या, “चांगले दिसणाऱ्यांकडे…”
Vivek Oberoi was last seen in Rohit Shetty's Indian Police Force. (Photo: Vivek Oberoi/ Instagram)
Vivek Oberoi : विवेक ओबेरॉयने सांगितलेला अनुभव चर्चेत, “पांढऱ्या दाढीतील तो रहस्यमयी माणूस त्याने मला सांगितलं की…”
Iltija Mufti news
Iltija Mufti : “हिंदुत्व हा एक आजार, कारण..”; रतलामचा व्हिडीओ पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य
Anjali Damania Statement
Anjali Damania : अजित पवारांचं नाव घेत अंजली दमानियांची टीका, “माझ्या तळपायाची आग मस्तकात..”

शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या मस्तकावर डाव्या भुवईवर एक खोच कोरण्यात आली होती, असा दावा केला जात आहे. काही इतिहासकारांनी दावा केला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केल्यानंतर, खानाच्या वकिलाने म्हणजेच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांच्या मस्तकावर तलवारीने वार केला होता. मात्र जिरेटोपामुळे राजे बचावले. मात्र महाराजांच्या कपाळावर मोठी जखम झाली. ही खुण त्यांच्या मस्तकावर होती. दुसऱ्या बाजूला, अनेक इतिहासकारांनी हे दावे फेटाळले आहेत. दरम्यान, अशीच एक खुण जयदीप आपटेने बनवलेल्या पुतळ्यावरही होती. त्यामुळे आपटे याने जाणून बुजून हा प्रकार केला होता का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोण आहे जयदीप आपटे?

जयदीप आपटे हा २५ वर्षे वयाचा तरुण शिल्पकार आहे. तो मूळचा कल्याण येथील रहिवासी आहे. जयदीप आपटेकडे २८ फुटांचा तांब्याचा पुतळा उभारण्याची जबाबदारी नौदलाने सोपवली होती. जयदीप आपटेने जून ते डिसेंबर अशा सात महिन्यांच्या कालावधीत हा पुतळा पूर्ण केला होता.

Amol Mitkari
अमोल मिटकरी यांची एक्सवरील पोस्ट (PC : Amol Mitkari/X)

हे ही वाचा >> Ajit Pawar : “राज्यातील १३ कोटी जनतेची माफी मागतो”, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

अमोल मिटकरींची आणखी एक पोस्ट

आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “महाराज माफ करा कुण्या तोंडानं माफी मागावी? महाराष्ट्राचा इतिहास ज्या नावाने दैदीप्यमान बनवलाय त्याच राजांचा पुतळा असा कोलमडून पडावा? आणखी मोठा पुतळा उभारताय, मात्र ज्याला कंत्राट दिलं त्याची गुणवत्ता का तपासली नाही? हे चित्र वेदनादायी व असह्य आहे. कुण्या तोंडाने माफी मागावी.”

Story img Loader