Amol Mitkari Unhappy with Mahayuti : अमरावती येथे आज (१३ ऑगस्ट) महायुतीची पश्चिम विदर्भाची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या भागातील विधानसभा मतदारसंघामधील मोर्चेबांधणी, व निवणुकीच्या पूर्वतयारीसाठी ही महत्त्वाची बैठक होती. महायुतीमधील प्रमुख तीन पक्षांसह इतर मित्रपक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते. यावेळी भाजपा व शिवसेना नेत्यांनी भाषणं केली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार गट) एकाही नेत्याला भाषण करण्याची संधी मिळाली नाही. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला डावलल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर अजित पवार गटातील विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी यांनी महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेल्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आजच्या बैठकीत जे काही झालं त्याची माहिती ते पक्षश्रेष्ठींना देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

अमोल मिटकरी म्हणाले, “ही बैठक ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र या बैठकीला दोन वाजता सुरुवात झाली. यावेळी भाषण करणाऱ्यांची मोठी गर्दी होती. भाजपाकडून आमदार प्रसाद लाड आले होते. शिवसेनेच्या शिंदे गटाकडून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत या बैठकीला उपस्थित होते. या तिघांची भाषणं झाली. त्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की आमचे समन्वयक अनिकेत तटकरे यांना बोलण्याची संधी मिळेल. मात्र त्यांना संधी मिळाली नाही. ते देखील बैठकीच्या शेवटच्या टप्प्यात निघून गेले.”

hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

अजित पवार गटाचे आमदार म्हणाले, “महायुतीमध्ये समन्वय ठेवण्यासाठी तिन्ही पक्षांना सारखा मानसन्मान मिळाला पाहिजे. मित्रपक्षांना मानसन्मान दिला गेला पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्यासह इतर लहान पक्षांनाही सन्मान दिला गेला पाहिजे. परंतु, आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणतेही पदाधिकारी बोलू शकले नाहीत. मला मान्य आहे की वेळेचा आभाव होता. परंतु, आमच्या नेत्यासाठी पाच मिनिटं देता आली असती. मात्र तसं झालं नाही.”

शिष्टाचार पाळायला हवेत : मिटकरी

आमदार मिटकरी म्हणाले, “आजच्या बैठकीत जे काही झालं त्याबाबत नाराजी आहे का तर नक्कीच नाराजी आहे. आज जे काही झालं त्याबाबत मला खंत वाटते. साधारण एखादा कार्यक्रम असतो, तेव्हा शिष्टाचार पाळले जातात. तीन पक्ष एकत्र आहेत, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमधील एक प्रमुख पक्ष आहे. परंतु, आमच्या पक्षातील कोणत्याही नेत्याला इथे बोलू दिलं नाही. याबाबत मी पुढच्या बैठकीआधी आमच्या पक्षश्रेष्ठींशी बोलणार आहे.” मिटकरी हे टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हे ही वाचा >> Sanjay Raut on CM Face : काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नाही? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

मिटकरी वरिष्ठांकडे तक्रार करणार

यावेळी मिटकरी यांना प्रश्न विचारण्यात आला की आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी वागणूक मिळाली त्याची तुम्ही पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार करणार का? त्यावर मिटकरी म्हणाले, हो! मी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना म्हणजेच अजित पवार यांना, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांना आत्ताच सर्व माहिती कळवणार आहे. वरिष्ठांनी रितसर पत्र देखील लिहिणार आहे.

Story img Loader