भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) सत्तेत एकत्र आहे. अजित पवारांचा गट एनडीएचा सदस्यदेखील आहे. परंतु, भाजपा आमदार (विधान परिषद) गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघर्ष थांबलेला नाही. गोपीचंद पडळकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर पवार कुटुंबियांवर सातत्याने टीका करत असतात. गोपीचंद पडळकरांनी आज (१८ सप्टेंबर) पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे, अशी टीका पडळकरांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही वेळापूर्वी दिल्ली येथे टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी पडळकर म्हणाले, “धनगर समाजाबाबत अजित पवारांची भावना स्वच्छ नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही धनगर आरक्षणाबाबत पत्र दिलं आहे.”

गोपीचंद पडळकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने पडळकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी मी तुम्हाला नम्रतापूर्वक विनंती करतो, तुमचा तो पाळलेला कुxx गोप्या हा त्याच्या लायकीपेक्षा जास्त भुंकतोय. आज तो त्याच्या लायकीबाहेर भुकलेला आहे. ज्याची ख्याती मंगळसूत्र चोर अशी आहे, जो समाजाचा होऊ शकला नाही, जो आपल्या जन्म देणाऱ्या आईचा होऊ शकला नाही. सख्ख्या भावाचा होऊ शकला नाही, देवाचाही होऊ शकला नाही, अशा वाया गेलेल्या गोप्याला तुम्ही वेळीच आवर घालावी, वेसण घालावी.

हे ही वाचा >> “११ मे पासून आतापर्यंत विधानसभा अध्यक्षांनी काय केलं?” आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा थेट सवाल

आमदार अमोल मिटकरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देत म्हणाले, तुम्ही गोप्याला वेसण घातली नाही तर त्याचा उसळता वारू आम्ही आवरू, त्याला वेसण घालण्याची क्षमता अजित पवारांच्या प्रत्येक कार्यकर्त्यात आहे. गोपीचंद पडळकरला अजित पवारांविरोधात निवडणुकीला उभा राहिल्यावर बारामतीकरांनी त्याची लायकी दाखवून दिली आहे. मात्र राजरोजसपणे अजित पवारांवर तोंडसूख घेणाऱ्या गोप्याला तुम्ही आवर घलणार की नाही? तुम्ही त्याला आवर घालणार नसाल तर आम्हाला आवरणं तुमच्यासाठी कठीण होईल. ही आमची सूचना आहे. गोप्यासारख्या रान### वेळीच आवर घाला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amol mitkari warning to devendra fadnavis stop handle gopichand padalkar or else you cant stop us asc