परतवाडा ते बैतूल मार्गावर निंभोरा फाट्यानजीक भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर कार नाल्यात कोसळल्याने झालेल्या अपघातात ६ जण ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री उशिरा हा अपघात घडला. बोदड, कारंजा बहिरम, खरपी या गावांमधील मजुरांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी ही कार जात होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

परतवाडा येथील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या मजुरांना संततधार पावसामुळे त्यांच्या गावी सोडण्यासाठी दुकान मालकाने त्यांच्यासाठी स्वत:ची कार दिली आणि चालकाला वाहन सोपविले. बैतूल मार्गावर भरधाव वेगातील कार दुचाकीला धडकली, त्यानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार नाल्यात कोसळली. या अपघातात दोन दुचाकीस्वार आणि कारमधील चार मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर, एक जण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.