CM Devendra Fadnavis Inaugurated Amaravati Airport Live : अमरावतीकरांना गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेलं अमरावती विमानतळ आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या अखत्यारितील अमरावती विमानतळाचा उद्घाटन सोहळा आज (१६ एप्रिल) होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. अलायन्स एअर कंपनीची मुंबई – अमरावती – मुंबई ही विमानसेवा आजपासून सुरू होत आहे. या विमानतळावरून पहिलं विमान सकाळी ११.३० वाजता उड्डाण करेल. अलायन्स एअर कंपनी अमरावतीवरुन मुंबई अशी विमान सेवा सुरू करत आहे.

Live Updates

Amravati Belora Airport Inauguration Live Updates, 16 April 2025 : अमरावती विमानतळाच्या उद्घाटनासंदर्भातील बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

15:06 (IST) 16 Apr 2025

विमानाचं तिकीट किती रुपये असणार?

अमरावती ते मुंबई अशा विमान प्रवासाचं प्रति व्यक्ती २१०० रुपयांचं तिकीट काढावं लागणार आहे. मुंबई-अमरावती तिकीट देखील याच किंमतीत उपलब्ध आहे.

15:03 (IST) 16 Apr 2025

दरवर्षी १८० पायलट तयार होणार

अमरावतीत पायलट ट्रेनिंग स्कूल (वैमानिक प्रशिक्षण केंद्र) सुरू होणार आहे. us दक्षिण आशियामधील सर्वात मोठ पायलट ट्रेनिंग स्कूल असणार आहे. दरवर्षी येथे १८० पायलट तयार होतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. येथे ३४ विमानं पार्क (उभी) असतील.

13:56 (IST) 16 Apr 2025

अलायन्सपाठोपाठ ‘या’ दोन दिग्गज कंपन्या अमरावतीवरून विमानसेवा सुरू करणार

अलायन्सपाठोपाठ स्टार व इंडिगोची विमानं सुरू होणार आहेत.

13:13 (IST) 16 Apr 2025

“विमानतळ केवळ श्रीमंतांची बाब राहिलेली नाही, उद्योजग हल्ली…”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

विमानतळ ही केवळ श्रीमंतांसाठी बाब राहिलेली नाही. उद्योजक हे आता कुठेही उद्योग थाटायचा असेल तर तिथे विमानतळ आहे का ते पाहतात. जिथे विमानतळ तिथे उद्योग जातात. त्यामुळे उद्योग हवे असतील तर विमानत व हवाई वाहतूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्णाण करणं ही आमची प्राथमिकता आहे.

13:09 (IST) 16 Apr 2025

जगाच्या नकाशावर अमरावतीचं नाव ठळक होतंय : देवेंद्र फडणवीस

आज अमरावतीमधील विमानतळाचं लोकार्पण झालं आहे. यासह आता अमरावतीत पायलट ट्रेनिंग स्कूल (वैमानिक प्रशिक्षण केंद्र) सुरू होणार आहे. या स्कूलमुळे आपलं अमरावती शह जगाच्या नकाशावर ठळक होईल. कारण हे दक्षिण आशियामधील सर्वात मोठ पायलट ट्रेनिंग स्कूल असणार आहे. दरवर्षी येथे १८० पायलट तयार होतील. येथे ३४ विमानं पार्क (उभी) असतील.तिथे वैमानिकांना प्रशिक्षण मिळेल. याद्वारे येथे केवळ पायलट तयार होणार नाहीत. तर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाली होतील. नोकरीच्या नव्या संधी, असंख्य नोकऱ्या निर्माण होतील. हे पायलट ट्रेनिंग स्कूल म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आपल्याला मिळालेली मोठी भेट आहे. त्यामुळे अमरावती हे केवळ विमानतळ नव्हे तर जगाच्या पाठीवर मोठं पायलट ट्रेनिंग स्कूल असलेलं शहर म्हणून प्रसिद्ध होईल.

12:45 (IST) 16 Apr 2025

देशाला चांगले पायलट मिळतील : एकनाथ शिंदे

अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील एका कोपऱ्यातून दुसऱ्या कुठल्याही कोपऱ्यात जायला सात ते आठ तासांहून अधिक वेळ लागता कामा नये, असं आमच्या महायुती सरकारचं धोरण आहे. या नव्या विमानतळामुळे अमरावती ते मुंबई हा प्रवास दोन तासांत होईल. नागपूर ते मुंबई रस्ते प्रवास सहा तासांचा झाला आहे. समृद्धी महामार्गामुळे ते शक्य झालं आहे. आता अमरावती विमानतळाचं उद्घाटन झालं आहे. इथून नियमित विमान सेवा सुरू होत आहे. तसेच इथे प्रशिक्षण केंद्र सुरू होणार असल्यामुळे देशाला चांगले पायलट आणि प्रशिक्षकही मिळतील.

12:22 (IST) 16 Apr 2025

असं आहे अमरावती विमानतळ

अमरावती विमानतळाच्या धावपट्टीची लांबी १८५० मीटर असून रुंदी ४५ मीटर इतकी आहे.

आशियातील सर्वात मोठं एअर इंडियाचं वैमानिक प्रशिक्षण केंद्र इथे उभारलं जाणार आहे.

विमानतळावर एकाच वेळी एटीआर/७२ सीटर अशी दोन विमाने उभी केली (पार्क) जाऊ शकतात.

ऑक्टोबर महिन्यात विमानतळावर नाईट लॅण्डिंग देखील सुरू होणार आहे.

12:04 (IST) 16 Apr 2025

आता अमरावती-मुंबई प्रवास अवघ्या दोन तासांचा; १० तास वाचणार; प्रवासी विमानसेवा सुरू

अमरावती-मुंबई विमानसेवेचं उद्घाटन झालं असून आठवड्यातून तीन दिवस मुंबई-अमरावती-मुंबई अशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. या दोन प्रमुख शहरांमधील अंतर आता अवघ्या पावणे दोन तासांत पूर्ण करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे १० तास वाचतील. रस्त्याने याच प्रवासाला १२ ते १३ तास लागतात.

11:28 (IST) 16 Apr 2025

अमरावती विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं लॅन्डिंग

अमरावती विमानतळावर पहिल्या प्रवासी विमानाचं सुरक्षित लॅन्डिंग पार पडलं आहे. मुंबईवरून सकाळी साडेआठच्या सुमारास उड्डाण करणारं विमान सव्वाअकरा वाजता अमरावती विमानतळावर उतरलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितित अमरावती विमानतळाचे आणि प्रवासी विमान सेवेचे लोकार्पण झाले. पाठोपाठ एअर इंडिया एफटीओच्या डेमो फ्लाईटचे अमरावती विमानतळावरून देखील उड्डाण झाले.

10:53 (IST) 16 Apr 2025

अमरावती विमानतळावरून स्टार व इंडिगोची विमानं सुरू होणार; रवी राणांची माहिती

आमदार रवी राणा म्हणाले, यवतमाळ, अकोला भागातले प्रवासीही अमरावती विमानतळाहून मुंबईला जातील. तसेच आगामी काळात स्टार एअरलाईन्स व इंडिगो देखील अमरावती सेवा सुरू करत आहेत. भविष्यात अमरावती ते दिल्ली आणि अमरावती ते पुणे अशा सेवा सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अमरावती विमानतळाला भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचं नाव मिळावं अशी माझी इच्छा आहे.

10:34 (IST) 16 Apr 2025

प्रवासी विमानसेवेसह ‘एफटीओ’ विमानाचेही उड्डाण

आज अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण होत असतानाच एअर इंडियाच्या वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या (एफटीओ) विमानाचेही प्रात्यक्षिक उड्डाण (डेमो फ्लाईट) होणार आहे.

10:14 (IST) 16 Apr 2025

१८ एप्रिलपासून वेळापत्रकात बदल

१८ एप्रिल पासून दुपारी २.३० वाजता मुंबईवरून अमरावतीच्या दिशेने विमान निघेल जे ४.१५ वाजता धावपट्टीवर उतरेल. तर अमरावतीवरुन दुपारी ४.४० वाजता विमान निघेल जे सायंकाळी ६.२५ वाजता मुंबईत पोहोचेल. हेच वेळापत्रक पुढेही चालू राहील.

10:13 (IST) 16 Apr 2025

आजपासून विमानसेवा सुरू

मुंबई विमानतळावरून सकाळी ८.४५ वाजता विमानाने उड्डाण घेतलं आहे. हे विमान काही वेळाने अमरावती विमानतळावर दाखल होईल आणि ११.३० वाजता अमरावतीवरून मुंबईच्या दिशेने विमान रवाना होईल.

10:08 (IST) 16 Apr 2025

अमरावतीकरांना आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा मिळणार

आठवड्यातील सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी असणार आहे.