अमरावतीची जागा नवनीत राणा लढवणार का? याची चर्चा चांगलीच रंगली आहे. भाजपाच्या तिकिटावर त्या जागा लढवतील अशी चिन्हं आहेत. तसंच त्यांचा भाजपात प्रवेश होऊ शकतो अशीही शक्यता वर्तवली जाते आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

“भाजपाच्या वतीने ज्या उमेदवारांची उमेदवारी घोषित झाली आहे त्या ठिकाणी आम्ही निवडणुकीच्या तयारीचा आढावा आम्ही घेत आहोत. अकोल्यात आहोत, वर्धा या ठिकाणी आम्ही जात आहोत. जाहीर प्रचाराच्या आधीच्या व्यवस्था लावणं हे आम्ही करतो आहोत. अकोला आणि वाशिमच्या टीमने अतिशय चांगली तयारी केली आहे. बुथ पर्यंत चांगली रचना केली आहे. आम्ही सगळं नियोजन केलं आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नवनीत राणा अमरावतीतून लढणार?

अमरावतीची जागा भाजपा लढणार, जो उमेदवार असेल तो भाजपाच्या चिन्हावर लढेल. नवनीत राणा या विद्यमान खासदार आहेत. नवनीत राणा पाच वर्षे भाजपासह आहेत. लोकसभेत त्यांनी पाच वर्षे अत्यंत ताकदीने भाजपाची आणि मोदींची बाजू मांडली आहे. मात्र अंतिम निर्णय आमची निवडणूक समिती घेणार आहे. त्यामुळे त्याबद्दल आम्ही जास्त काही सांगू शकत नाही. जिथे भाजपा जागा लढवणार आहे तिथे महायुती भाजपासाठी प्रचार करेल. जी जागा शिवसेनेला, राष्ट्रवादीला असेल तिथे आम्ही त्यांचा प्रचार करु हे ठरलेलं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हे पण वाचा- “एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांपेक्षा मी रवी राणांना घाबरतो”… बच्‍चू कडूंनी उडवली खिल्‍ली

हर्षवर्धन पाटील नाराज नाहीत

आज हर्षवर्धन पाटील यांनी माझी भेट घेतली. मात्र ते नाराज नाहीत. हर्षवर्धन पाटील यांनी काही मुद्दे मांडले होते. स्थानिक पातळीसमोरचे काही प्रश्न होते. मी त्यांचे प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे. हर्षवर्धन पाटील भाजपात आल्यापासून ते समर्पित भावनेने काम करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांचं नेतृत्व मोठं झालं पाहिजे ही भाजपाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते आमच्या उमेदवाराचं काम ताकदीने करतील असा मला विश्वास आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amravati loksabha seat will contest by bjp what devendra fadnavis said about navneet rana scj
Show comments