खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले. यानंतर आता अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असोसिएशनकडून निवेदन देत तक्रार करण्यात आली आहे. यावर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करू,” अशी माहिती सिंग यांनी दिली. त्या मंगळवारी (१३ सप्टेंबर) अमरावतीत माध्यमांशी बोलत होत्या.

डॉ. आरती सिंग म्हणाल्या, “चार दिवसांपासून अनेक संघटना, निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी असोसिएशनच्या ५०-६० सदस्यांनी निवेदनं दिली आहेत. तसेच त्यांची बाजू मांडली. आम्ही त्यांची निवेदनं घेतली आहेत. त्यावर आम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेत आहोत. त्यांच्याकडून जो सल्ला मिळेल त्यावर विचार करून कायदेशीर कारवाई करू.”

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Kalyan Crime News in Marathi
Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा मुजोरी; चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
What Mallikarjun Kharge Said?
Mallikarjun Kharge : “भाजपा खासदारांकडून आमच्यावर हल्ला, आमची खिल्ली उडवली…”, मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप
congress mla nitin raut
माजी केंद्रीय मंत्र्यांच्या नावाचा वापर करून युवकांची फसवणूक, काँग्रेस आमदाराचा धक्कादायक आरोप
badshah traffic violation allegation
बादशाहवर वाहतुकीचे नियम मोडल्याने झाली कारवाई? रॅपर स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझ्याकडे तर…”

दरम्यान, नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये कॉल रेकॉर्डिंग केल्यावरून पोलिसांची हुज्जत घातली होती. त्यांनतर खासदार राणांविरोधात अमरावतीत अनेक संघटनांनी निवेदन दिली आहेत. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी ही सर्व निवेदने स्वीकारली आहेत. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी दिली.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

“माझ्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत, त्यावरून असं दिसतं की पोलीस खात्यात काही मोजके लोक आहेत, ते नेतेगिरी करत आहेत. ते आपल्या खाकी वर्दीचा गैरवापर करत आहेत. आम्ही ज्या कारणासाठी पोलीस ठाण्यात आंदोलन केलं ते सार्थकी लागलं. कारण त्या मुलीचे आईवडील माझ्याकडे येऊन तीन तास रडत होते. त्या मुलीला मी घरी परत आणलं आहे”, अशी प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.

हेही वाचा – “ज्या मुलीने १३व्या वर्षी घाणेरड्या चित्रपटातून…”, नवनीत राणांवर किशोरी पेडणेकरांचं टीकास्र!

यावेळी त्यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावरही आरोप केले आहे. “माझ्यावर जे गुन्हे दाखल होत आहेत. त्यामागे पोलीस आयुक्त आरती सिंग यांचा हात आहे. मात्र, मी अशा केसेला घाबरत नाही, मी ही लढाई माझ्या नागरिकांच्या न्यायहक्कासाठी लढत आहे”, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा – अमरावती : खा. नवनीत राणा यांच्‍या विरोधात निवृत्‍त पोलीस आक्रमक

दरम्यान, आमदार रवी राणा यांनीही अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले. “आरती सिंग यांनी अडीच वर्षांत महिन्याला ७ कोटी रूपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पोहचवले असून याप्रकरणाची आता उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत”, असे ते म्हणाले.

Story img Loader