माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आपण आजपर्यंत अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रम आणि म्युझिक अल्बमधून गाताना पाहिले आहे. नुकतच त्यांनी व्हॅलेंटाईन डे निमित्त एक इंग्रजी गाणे गायल्याचे समोर आले आहे. खुद्द अमृता यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर गाण्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पण त्यांचे हे गाणे नेटकऱ्यांच्या पसंतीला उतरले नसल्याचे दिसत आहे. नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
अमृता फडणवीसांनी १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त गायलेल्या गाण्याचा मुळ गायक lionel richie आहे. या २ मिनिटे १७ सेकंदाच्या अल्बममध्ये अमृता यांनी स्वत:च्या अंदाजात गाणे गायल्याचे दिसत आहे. अल्बमम्ध्ये त्या अत्यंत सुंदर दिसत आहेत.
Darkness cannot drive out darkness, only Light can do that ! Hate cannot drive out hate, only Love can do that ! Here’s a cover version of my favourite song by @lionelrichie ! Njoy the whole song wth on https://t.co/NpunS8SXli #HappyValentinesDay #HappyValentinesDay2020 pic.twitter.com/cOQX3Mo36u
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) February 14, 2020
अमृता यांनी गायलेले गाणे हे lionel richieने १९८३ मध्ये गायले आहे. त्यांना हे गाणे फार आवडत असल्याने त्यांनी स्वत:च्या स्टाईलमध्ये रेकॉर्ड करुन अल्बम शूट केला. त्यांनी गायलेले हे गाणे कव्हर व्हर्जन आहे. यापूर्वी ही त्यांनी अनेक गाणी गायली होती. त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबतही एक अल्बम रेकॉर्ड केल्याचे म्हटले जाते. पण त्यांना या अल्बममुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
Wowwww outstanding………
SuperbRanu mandal se to badhiya he haii…
— PSI Chetan M (@ChetanM80124887) February 14, 2020
— amit deshpande (@_amit008) February 14, 2020
अमृता यांचे हे गाणे नेटकऱ्यांना फारसे आवडले नाही. अनेक युझर्सनची त्यांची खिल्ली उडवली होती. एका युजरने तर रानू मंडल मंडल यांच्या पेक्षा चांगले आहे असे म्हटले तर दुसऱ्या युजरने ‘हे मले सैन नाई होत’ असे म्हटले.