महाराष्ट्रात सध्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पण या सगळ्या गोंधळात देखील राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुरणपोळी प्रेमाची भलतीच चर्चा रंगली आहे. चर्चा इतकी की फडणवीसांनी देखील एका कार्यक्रमात बोलताना “मी जिथे जातो, तिथे लोक मला पुरणपोळ्याच खायला देत आहेत”, असं म्हणत तक्रारवजा मिश्किल टिप्पणी देखील केली होती. या सगळ्या प्रकारानंतर फडणवीसांना खरंच पुरणपोळ्या आवडतात का? अमृता फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ विधानात नेमकं किती तथ्य आहे? यावर खुमासदार चर्चा सुरू झाली होती. त्यावर अखेर खुद्द अमृता फडणवीसांनीच खुलासा केला आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस दाम्पत्यानं यासंदर्भात मिश्किल शब्दांत स्पष्टीकरण दिलं आहे.

अमृता फडणवीसांचा ‘तो’ दावा!

अमृता फडणवीस यांनी एका मनोरंजन वृत्तवाहिनीवर बोलताना हा दावा केला होता. कार्यक्रमात एका बैठकीत देवेंद्रजी किती पुरणपोळ्या खाऊ शकतात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता यांनी ते ३०-३५ पुरणपोळ्या सहज पातेलंभर तूपासोबत खायचे असे म्हटले आहे. त्यापोठापाठ लग्नानंतर तुमची अपूर्ण राहिलेली इच्छा कोणती? हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता यांनी ३०-३५ पुरणपोळ्या खाताना पाहण्याची, त्याही मी न बनवलेल्या, असं उत्तर अमृता फडणवीस यांनी दिलं होतं.

Uddhav Thackery
Uddhv Thackeray : “संघर्षाची ठिणगी पडू द्यायची नसेल तर…”, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनासाठी उद्धव ठाकरेंचा पोलीस आणि निवडणूक आयोगाला इशारा
ajit pawar sharad pawar sadabhau khot
“त्या विधानानंतर मी सदाभाऊ खोतांना फोन केला आणि…”,…
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 Live : विधानसभेची रणधुमाळी सुरु, शरद पवारांच्या नागपुरात तीन प्रचारसभा, यांसह महत्वाच्या बातम्या
Petrol and Diesel Prices On 7th November
Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं की महाग? तुमच्या शहरातील इंधनाचा दर तपासा
Sharad Pawar News
Sharad Pawar : “महाराष्ट्राच्या जनतेला परिवर्तन हवं आहे आणि आम्ही..”, काय म्हणाले शरद पवार?
What Ajit Pawar Said About MVA and Balasaheb Thackeray?
Ajit Pawar : अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत, “बाळासाहेब ठाकरे हयात असते तर महाविकास आघाडी..”
What Ajit Pawar Said About Sharad Pawar?
Ajit Pawar : “शरद पवारांचं राजकारण मलाच नाही तर महाराष्ट्रात कुणालाच…”, अजित पवार काय म्हणाले?
Raj Thackeray appeal to the voters regarding voting in the meeting in Mangalvedha
निवडून आलेले तुमचे गुलाम, तुम्ही गुलाम होऊ नका; मंगळवेढ्यातील सभेत राज ठाकरेंचे आवाहन
Dhananjay Munde On Parli Assembly Constituency
Dhananjay Munde : “माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना…”; धनंजय मुंडेंच्या विधानाचा रोख कुणाकडे?

यासंदर्भात विचारणा केली असता देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरश: विनंती करत अमृता फडणवीसांना यावर खरं काय ते सांगण्याची विनंती केली. “प्लीज सांग, प्लीज सांग. माझी फार पंचाईत होतेय. मी जिथे जातो तिथे लोक मला पुरणपोळीच खायला देत आहेत”, असं फडणवीस म्हणाले.

“…नाहीतर मी कुणाच्या बापाला घाबरत नाही”, अमृता फडणवीसांचं ट्रोलर्सला प्रत्युत्तर; म्हणाल्या, “यांच्या ट्रोलिंगमुळे…!”

अमृता फडणवीस यांचं स्पष्टीकरण!

फडणवीसांनी विनंती केल्यानंतर अखेर अमृता फडणवीसांनी या सगळ्या प्रकारावर स्वत: खुलासा केला. “आमचं जन्मात कधी भांडण झालेलं नाही. पण जिथे-तिथे लोक यांना पुरणपोळ्या खाऊ घालतात. मग हे घरी येतात आणि माझ्यावर चिडतात. म्हणून मला स्पष्ट करावं लागेल. देवेंद्र फडणवीसांचे एक मित्र आहेत खूप लहानपणीचे. त्यांनी मला लग्नाच्या आधी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीसांनी एका लग्नाच्या पंगतीत पैजेवर ३०-३५ पुरणपोळ्या खाल्ल्या होत्या आणि ते जिंकले होते. ती भीती मला होतीच. पण लग्नानंतर मी पाहिलं की त्यांनी अर्धी पोळी देखील कधी माझ्यापुढे खाल्ली नाही”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

“निवडणुकीच्या राजकारणात माझ्या घराण्यातील मी शेवटची व्यक्ती असेन, कारण…”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

फडणवीस म्हणतात, “प्लीज मला पुरणपोळी…!”

“मी सगळ्यांना विनंती करतो, की मला पुरणपोळ्या आवडत नाहीत. मला प्लीज जिथे गेलं तिथे पुरणपोळी खायला देऊ नका. मी नाही खाऊ शकत हो. तुम्हाला हवं तर सांगतो, मला शिरा आवडतो, मोदक आवडतात, बंगाली मिठाई देखील आवडते. पण प्लीज पुरणपोळी नका पाठवू”, अशा मश्किल शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी पुरणपोळी पुराणावर पडदा टाकला!