उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्या वेळोवेळी सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांवर आपली भूमिका मांडताना दिसतात. दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर भाष्य केले आहे. तो गनिमी कावा होता. भविष्यात देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या जीवनावर आधारित एखादे पुस्तक येईल, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. त्या पुण्यात माध्यम प्रतिनिधींश बोलत होत्या.
हेही वाचा >>> “उत्पादन शुल्क घोटाळ्यात मनीष सिसोदिया प्रमुख आरोपी पण…” अरविंद केजरीवाल यांचे नाव घेत भाजपाने केला मोठा दावा
“देवेंद्र फडणवीस हुडी घालून, गॉगल तसेच मास्क लावून बाहेर जायचे. ते कोणाला भेटत होते याबद्दल मला माहिती नाही. ते एकनाथ शिंदे, अजित पवार होते की अशोक चव्हाण होते, याबाबत मला माहिती नाही. तो गनिमी कावा होता. भविष्यात दवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची पुस्तकं येतील. त्यांच्या जीवनात सांगण्यासारखे खूप काही आहे,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का? ब्राह्मण महासंघाच्या मागणीवर चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“घराणेशाही बाजुला ठेवली तर एकनाथ शिंदे यांच्याकडेच शिवसेनेचे नेतृत्व यायला हवे होते. आता ते शिवसेनेचे नेतृत्व करत आहेत, याचा मला आनंद आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात आले होते. तेव्हाच ते जनतेची सेवा करण्यासाठी आले होते. त्यामुळे पुन्हा येण्याची गरज नव्हती. हेच खरे नेतृत्व होते,” असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
हेही वाचा >>> पुण्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस झाले तर…? अमृता फडणवीस म्हणाल्या…“त्यांची जन्मभूमी, कर्मभूमी…”
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, या मागणीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “कोणाला कोणते पद द्यायचे तसेच लोकसभा लढणे या त्यांच्या अंतर्गत बाबी आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही नागपूर आहे. त्यामुळे नागपूरशी एवढ्या लवकर त्यांची नाळ तुटू शकणार नाही,” असेही अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केले.