सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. उर्फीला असं कमी कपड्यात रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली. यानंतर उर्फीनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. “डीपी मेरा धासू, चित्रा वाघ मेरी सासू” अशी शब्दांत उर्फीने चित्रा वाघ यांना टोला लगावला आहे.
हा वाद सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी एक स्त्री म्हणून जे काही करतेय, त्यात मला काहीही वावगं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली. त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
आणखी वाचा- उर्फी जावेदने पुन्हा केलं ट्वीट, स्वत:च्या अंतर्वस्त्राचा उल्लेख करत म्हणाली, “…चित्रा वाघ ग्रेट है”
उर्फी जावेद-चित्रा वाघ वादाबाबत विचारलं असता अमृता फडणवीस म्हणाल्या, “चित्रा वाघ यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे की, काहींची व्यावसायिक गरज असते, त्यांना त्याप्रकारचे सीन करावे लागतात. पण तुम्ही केवळ प्रकाशझोतात राहण्यासाठी रस्त्यावर तसं फिरत असाल, तर ते ठीक नाहीये. उर्फी एक कलाकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी जाताना संस्कृती जपली पाहिजे. तुमचं व्यवसायिक आयुष्य आणि सार्वजनिक आयुष्य वेगळं असतं.”
हेही वाचा- “जी नंगानाच करत फिरतेय, तिला…”, महिला आयोगाच्या नोटीशीनंतर चित्रा वाघ यांचा संताप
“याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार होते, ते त्यांनी प्रकट केले आहेत. त्यानुसार त्या कारवाई करत आहेत. माझा विचार असा आहे की, उर्फीने जिथे फ्रोफेशनली कमेंटमेंट नाही. तिथे संस्कृतीच्या हिशोबाने राहिलं तर चांगलं आहे. बाकी मला वैयक्तिक सांगायचं झालं तर… उर्फीही एक स्त्री आहे, ती जे काही करतेय. ते ती स्वत:साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीही वावगं वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीसांनी दिली.