दोन वर्षानंतर यंदा गणपती विसर्जन मोठ्या उत्साहात पार पडले. शनिवारी सकाळपर्यंत मुंबईतील चौपाट्यांवर गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने दाखल होत होते. विसर्जनानंतर या भागात घाणीचे साम्राज्य हे दरवर्षीचे चित्र असते. पण यंदा राजकीय नेत्यांबरोबर सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहिमेला सुरवात केली होती. अमृता फडणवीस आणि भामला फाउंडेशनचे  संस्थापक आसिफ भामला यांनी जुहू बीचवर स्वच्छता मोहिम राबवली. ‘ना कचरा करुंगी, ना करने दुंगी’ म्हणत अमृता फडणवीस यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

हेही वाचा- भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार! आज ‘तारागिरी’ युद्धनौकेचे जलावतरण

१० दिवसांचा गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गणपती विसर्जनानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवरील दृश्य उदासीनतेचे असते. कारण विसर्जनानंतर मुर्तींचे अवशेष, निर्माल्य सारं काही किनाऱ्यांवर जमा होतं. शहर नागरी प्राधिकरणाच्या प्रयत्नांना पाठिंबा देताना, गणपती विसर्जनानंतर शहरातील समुद्रकिनाऱ्यांच्या चिंताजनक समस्येबद्दल जनजागृती करण्यासाठी अमृता फडणवीस यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला

राजकीय व्यक्तींसोबत कलाकारांचाही स्वच्छता मोहिमेत समावेश

मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली. यावेळी अमृता फडणवीस यांच्यासोबत आमदार आणि अभिनेत्यांनीही सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे २ हाजरहून अधिक स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते.

स्वतःला आणि पर्यावरणाला स्वच्छ ठेवणे ही मूलभूत गरज आहे. याची शिकवण आपल्याला लहानपणापासून देण्यात आली आहे. स्वच्छतेचे धडे गिरवून त्यांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात लागू करणे हा एकमेव उपाय आहे. जेणेकरून आपण निसर्गाच्या संसाधनांचा पूर्ण आनंद घेऊ शकतो.  आपल्या मुलांना शुद्ध पर्यावरण देऊ शकतो आणि सागरी जीवन निर्मल बनवू शकतो. प्लॅस्टिकचे दीर्घकाळ विघटन होत नसल्यामुळे आपल्या अन्न आणि पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण आधीच दिसून येतात. जर हे थांबले नाही तर ते निसर्गासोबत आपले आरोग्यही धोक्यात येईल असे फडणवीस म्हणाल्या.

हेही वाचा- यंदा २,०६६ गणेशोत्सव मंडळे उत्सवापासून दूर; २,६७२ ने घरगुती गणपतींची संख्या घसरली 

ना कचरा करुंगा ना करणे दुंगा

ज्या पद्धतीने आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचे ब्रीदवाक्य आहे ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’. त्याचप्रमाणे आपण सुद्धा मनाशी घट्ट केलं पाहिजे की, ना कचरा करुंगा ना करणे दुंगा. आपल्या भारतीय संस्कृतीत असे मानले जाते की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते.

Story img Loader