Amruta Fadnavis महाराष्ट्रात निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. या निवडणुकीच्या आधी चर्चेत आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र आहेत त्यांना दरमहा १५०० रुपये मिळत आहेत. २ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचे पैसे मिळाले आहेत. ऑक्टोबर महिन्यांत आचारसंहिता लागणार असल्याने या महिन्याचे आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसेही लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा करण्यात आले आहेत. दरम्यान याच लाडकी बहीण योजनेवर अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी केलेली पोस्ट चर्चेत आली.

काय आहे लाडकी बहीण योजना?

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहिना १५०० रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी केली जाणार आहे. त्यासाठी सरकारवर वर्षाला ४६ हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. १ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले होते.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Rashmi SHukla on Sharad Pawar
Rashmi Shukla Transferred : रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची प्रतिक्रया, म्हणाले, “आता त्या…”
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ‘जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार?’, राजू पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Uddhav Thackeray Meets Devendra Fadnavis?
Uddhav Thackeray Devendra Fadnavis Meet ? : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची भेट? संजय राऊतांचा अमित शाह यांना फोन? विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले?
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

हे पण वाचा- Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!

प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा १५०० इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे १५०० पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात आले. याच योजनेसंदर्भात आता अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी केलेली पोस्ट चर्चेत आहे.

काय म्हटलंय अमृता फडणवीस यांनी?

‘माझी लाडकी बहीण’ ही केवळ योजना नसून आपल्या सर्व बहिणींच्या आर्थिक सन्मानाला जपणारी भावाकडून बहिणीला दिलेली प्रेमाची ओवाळणी आहे. राखी पौर्णिमेला मी महिला मेळाव्यात,शिक्षक सहकारी बँक सभागृहात यासंदर्भात आपल्याला आवाहन केलं होतं, भावाला कायम साथ देण्याचं आणि आता भाऊबीजेला देखील तेच सांगते की सर्व लाडक्या बहिणींच्या प्रेमाचा ठेवा मायेची थाप देवेंद्रजींच्या पाठीवर असू द्या.मला खात्री आहे की आपण बहिणी भावाच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभ्या राहू ! अशी पोस्ट अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी केली आहे.

लाडकी बहीण योजनेवर मविआची टीका

लाडकी बहीण योजना आल्यापासूनच विरोधकांनी म्हणजेच महाविकास आघाडीने या योजनेवर टीका करण्यास सुरुवात केली. ही योजना सरकारने फक्त निवडणुकीपुरती आणली आहे अशी टीका मविआने केली. तसंच काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनीही या योजनेवर टीका केली. महायुतीचं सरकार लोकसभा निवडणुकीत फार काही चांगली कामगिरी करु शकलं नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या सरकारला लाडकी बहीण आठवली. त्याआधी बहीण लाडकी नव्हती असा टोला शरद पवारांनी लगावला होता. आता निवडणुकीच्या तोंडावर अमृता फडणवीस ( Amruta Fadnavis ) यांनी या योजनेचं भरभरुन कौतुक केलं आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना कधीही बंद पडणार नाही असंही म्हटलं आहे.