उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस समाज माध्यमांवर खूप सक्रीय आहेत. समाज माध्यमवार समाजात घडणाऱ्या घटनांवर अमृता फडणवीस निर्भिडपणं आपलं मत व्यक्त करतात. यामुळे अनेकदा त्यांच्यावर टीका होत असते, तसेच नेटकरी ट्रोलही करतात. अशातच आता अमृता फडणवीस यांनी ट्रोलिंग, राजकीय दबाव आणि टीका यावर सडेतोड भाष्य केलं आहे.
एका वृत्तपत्राशी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “आपल्याला घरातून किंवा अंतरात्म्यातून बळ मिळत असते. परिवर्तन करण्याची किंवा बदल घडवण्याची जी शक्ती आहे, ती आपल्यात असते. प्रत्येक स्त्रीने बदल घडवण्याचं दायित्व घेतलं पाहिजे. मग, हे जग जगण्यासाठी सुंदर वाटेल,” असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा : “राज्यपाल कोश्यारींनी अनेकदा घटनाविरोधी कृत्य केली”, सत्तासंघर्षावरून घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विधान
समाजात वावरताना नातेवाईकांचा आणि राजकीय दबाव आला आहे का? असा प्रश्न विचारल्यावर अमृता फडणवीसांनी म्हटलं, “सदैव हा विचार केली की, आपण व्यक्त झालं नाहीतर, तुम्ही सशक्त होऊ शकणार नाही. मला खूपदा लोकांनी ट्रोल केलं. पण, मी त्यांच्या समजून माझ्या चुका सुधारात पुढे गेली आहे. हाच रस्ता आपल्याला शक्ती देतो. कुटुंबीयांकडून कधीच कोणी हे कर, हे करु नको सांगितलं नाही. एखाद्यावेळेस चूक झाली, तर सल्ला दिला जातो. आणि तसदी घेऊन त्यात बदल करते. तसेच, माझ्यावर कोणीही ना राजकीय दबाव आणला, ना आणू शकतो, ना मी आणू देते,” असं स्पष्टीकरण अमृता फडणवीस यांनी दिलं आहे.