Amruta Fadnavis on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा पडल्याने राज्यभर संतापाचं वातावरण आहे. आदित्य ठाकरेंनी आज राजकोट दौरा केला असताना नारायण राणेही तेव्हाच तिथे आले. त्यामुळे या दोन्ही समर्थकांत तुफान राडा झाला. या दरम्यान जर काही झालं तर याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा थेट इशाराच आदित्य ठाकरे यांनी राजकोटवरून दिला. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

कंत्राटदाराला धारेवर धरा

मुंबई महानगरपालिका, मुंबई पोलीस यांच्या सहकार्याने दिव्याज फाऊंडेनमार्फत अमृता फडणवीस यांनी बच्चे बोले मोरया या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. “मी एवढंच म्हणेन की ही घटना फारच दुःखद आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. हवेच्या जोरामुळे तो पुतळा कोसळला. त्याचे कंत्राटदार कोण आहेत हे पाहून त्यांना धारेवर धरलं पाहिजे. त्यापेक्षाही मोठा पुतळा उभारायला पाहिजे, हीच मी विनंती करू शकते”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Devendra Fadnavis on Vote Jihad
Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
accountability of devendra fadnavis declined due to his divisive politics says supriya sule
फोडाफोडीच्या राजकारणामुळे फडणवीसांची विश्वसनीयता कमी; सुप्रिया सुळे
nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सातत्याने महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यावरूनही अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “जगाच्या कोपऱ्यात कुठेही काहीही झालं तरी स्त्री म्हणून दु:ख वाटतं. यावर एक उपाय नाही, त्यावर खूप सारे उपाय मिळून एक उपाय मिळतो. सरकार, पोलीस, कायद्यातून न्याय मिळू शकतो. पण याच्या मुळावर आपण लक्ष दिलं पाहिजे. घरातूनच शिकवंल की महिलांना आदर दिला पाहिजे तर तुम्ही बाहेर जाऊन स्त्रीचा आदर कराल. पण असे सायकोपॅथ असतात त्यांच्या घरी काही शिकवलं जात नाही. त्यांच्या घरात ते पाहतात की घरातील स्त्रीयांवर अत्याचार होतात. त्यामुळे ते बाहेर जाऊन अत्याचार करतात. त्यामुळे कुटुंब हे मूळ आहे. समाजात जे काही घडतं ते कुटुंबातील शिकवणीमुळे घडतं. महिलांचा आदर करा हे मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

हेही वाचा >> Narayan Rane : “पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला”, मालवणातील घटनेप्रकरणी नारायण राणेंचा दावा

पुतळाप्रकरणी गुन्हा दाखल

मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे, आणि बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, शासनाची फसवणूक यांसह व गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे साहाय्यक अभियंता अजित जनकराज पाटील यांच्या तक्रारीनंतर मालवण पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला.