उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असं वक्तव्य केलं. यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमृता फडणवीस सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे इत्यादीही उपस्थित होते.
अमृता फडणवीस म्हणाल्या, “आम्ही ब्राह्मण आहोत आणि आम्हाला याचा गर्व आहे. आम्ही बुद्धीजीवी आहोत याचा आम्हाला गर्व आहे. आम्ही स्वाभिमानी आहोत याचा आम्हाला गर्व आहे, पण आम्हाला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही. ही आमच्यात कमतरता नाही, पण आम्ही असं करत नाही. आमचं तसंच दिसून येतं.”
“…म्हणून मोदी आणि वरच्यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवलं”
“आमची ती महानता तशीच दिसून येते. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस न मागता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी कधीच हे पद मागितलं नाही. देवेंद्र फडणवीसांची कार्यपद्धती, त्यांची लोकसेवा पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरच्यांनी त्यांना मुख्यमंत्री बनवलं,” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं.
व्हिडीओ पाहा :
“आज मी तुमच्या मागण्या वाचल्या आणि ऐकल्या. सतीशजी मी पूर्णपणे तुमच्या मागे आहे. पंचवटी विभागात १२ वर्षांपासून आपली इमारत अडकली आहे. आता या प्रश्नावर उपाय निघालाच पाहिजे,” असंही अमृता फडणवीसांनी नमूद केलं.
हेही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात एकही महिला नसल्यावरून अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाल्या….
या कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवारही उपस्थित होत्या. त्यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली.