रविवारी भाजपाचे मंत्री गिरिश महाजन यांची कन्या श्रेया महाजन यांचा विवाहसोहळा जामनेरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. मुळचे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अक्षय गुजर यांच्यासोबत श्रेया विवाहबंधनामध्ये अडकली. अक्षय हे आयटी इंजिनयर असून त्याचा कोणत्याही राजकीय घराण्याशी संबंध नाहीय. मात्र महाजन यांच्याकडून राज्यातील अती महत्वाच्या व्यक्तींनी या लग्नाला आवर्जून हजेरी लावली. या लग्नाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. यावेळी अमृता यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर त्यांनी अगदी हलक्यापुलक्या शब्दांमध्ये राऊत यांना एक सल्ला दिला.

नक्की पाहा >> Photos: गिरीश महाजनांच्या मुलीचा शाही विवाहसोहळा; फडणवीस, पंकजा, संभाजीराजेंनी लावली हजेरी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गिरिश महाजनांच्या मुलीच्या लग्नाला जमानेरमध्ये दाखल झालेल्या अमृता फडणवीस यांनी लग्नमंडपामध्येच पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना राज्यामध्ये अनेक विषय गाजत आहेत. ज्यामध्ये नेतृत्वाचा विषय असेल किंवा एमआयएम आणि शिवसेना एकत्र येण्याचीही चर्चा सुरुय. याकडे तुम्ही कसं बघता, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अमृता यांनी, “आज मला एवढचं माहितीय की गिरीश महाजनजींच्या मुलीचं लग्न गाजतंय. तर मी ते एन्जॉय करतेय, मला काहीच ठाऊक नाहीय काय घोळ चालू आहे. मी तो थोडा माहिती करुन घेईन आणि नंतर मुलाखत देईन,” असं उत्तर दिलं.

त्यानंतर अन्य एका पत्रकाराने संजय राऊतांच्या नागपूर दौऱ्यावर अमृता यांना प्रश्न विचारला. संजय राऊत नागपूरच्या दौऱ्यावर येतातय, असं म्हणत या पत्रकाराने अमृता यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अमृता यांनी, “नागपुरी सावजी (मटण) नक्की खाल, हे मी त्यांना सजेस्ट करु शकते,” असं हसत म्हटलं.

नक्की वाचा >> होळीच्या शुभेच्छा देतानाही अमृता फडणवीसांचा संजय राऊतांवर निशाणा; फॅमिली फोटोची कॅप्शन चर्चेत

शिव संवाद दौऱ्याअंतर्गत शिवसेनेचे सर्व खासदार हे २२ मार्च ते २५ मार्चदरम्यान मराठवाडा आणि विदर्भाच्या दौऱ्यावर असतील. संघटनात्मक बांधणी तसेच जिल्हा परिषद गटांमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्देशांनुसार हा संवाद दौरा आयोजित करण्यात आलाय. याच दौऱ्यादरम्यान संजय राऊतही उद्यापासून नागपूरमध्ये असतील.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis suggestion to sanjay raut for his nagpur tour scsg