राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील महाविकास आघाडी सरकारवर नेहमीच टीका करताना दिसून येतात. अनेक प्रसंगी माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर कधी थेट तर कधी खोचकपणे निशाणा साधला आहे. अशाच प्रकारची टीका पुन्हा एकदा त्यांनी केली असून नागपूरमध्ये एका कार्यक्रमामध्ये माध्यमांशी बोलताना अमृता फडणवीस यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवर भ्रष्टाचारावरून टीका केली आहे.

“खाऊंगा भी और खाने भी दूँगा”

राज्यात भ्रष्टाचार बोकाळल्याचं सांगतानाच अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्रात सध्या मै खाउंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालोंकी रक्षा भी करूंगा अशी परिस्थिती सुरू आहे. हे सगळं बंद व्हायला हवं”, असं अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.

राज्यात प्रगतीचं राजकारण हवं

दरम्यान, राज्यात प्रगतीचं राजकारण व्हायला हवं, असं अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या. “महाराष्ट्रात आमची एकच अपेक्षा आहे की प्रगतीचं राजकारण व्हायला हवं. भ्रष्टाचार बंद व्हायला हवा. पण आजकाल महाराष्ट्रात नेत्यांचा हाच विचार आहे की मैं खाऊंगा भी, खाने भी दूँगा, खानेवालोंकी रक्षा भी करूंगा. हे बंद व्हायला हवं. बाकी तुम्ही काही खा, काही खाऊ नका, त्याने काही होत नाही”, असं त्या म्हणाल्या.

“वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर…”; अमृता फडणवीसांनी दिलेल्या ‘त्या’ सल्ल्यावर संजय राऊतांचं उत्तर

अमृता फडणवीसांचा सल्ला आणि राऊतांचं प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीस यांनी नागपूर दौऱ्यावर असणाऱ्या संजय राऊतांना खोचक सल्ला दिला होता. “नागपुरी सावजी (मटण) नक्की खा, हे मी त्यांना सजेस्ट करु शकते,” असं त्या म्हणाल्या होत्या. त्यावर संजय राऊतांनीही खोचक प्रतिक्रिया देताना “वहिनीसाहेबांचा आग्रह आहे तर वहिनीसाहेबांचा हा आग्रह आम्ही पाळू”, असं म्हटलं होतं.

Story img Loader