आतापर्यंत तुम्ही पैसे, शॉपिंग, दूध आणि पाणी येणाऱ्या एटीएम मशीनबद्दल ऐकले असेल किंवा पाहिले असेल. पण पुण्यातील एका व्यक्तीने गणेश उत्सवाचे औचित्य साधून मोदक येणारे एटीएम मशीन तयार केले आहे. या एटीएम मशीनमध्ये विशेष कार्ड टाकून मोदकाचा प्रसाद मिळतो. एटीएम (एनी टाइम मोदक) मशीन पुण्यातील शंकर नगरमध्ये लावण्यात आले आहे.

पुण्यातील संजीव कुलकर्णी या व्यक्तीने एटीएम (एनी टाइम मोदक) मशीनचा शोध लावला आहे. क्रमांकावरील बटनाच्या जागी या मशीनवर धार्मिक शब्द लिहले आहेत. क्षमा, दान, सत्य, सदाचार, शांती, भक्ती, प्रेम, भावना, ज्ञान, स्नेह, सुख, निष्ठा, मोद आणि समाधान असे शब्द लिहले आहेत. मशीनमध्ये कार्डचा वापर केल्यानंतर एक छोटा डब्बा येतो. त्याच्या झाकणावर ओम लिहले आहे. तर आतमध्ये मोदक.

मशीनचा शोध लावणारे संजीव कुलकर्णी माहिती देताना म्हणतात, ‘ हे एक एटीएम मशीन आहे. याचा अर्थ एनी टाइम मोदक. तुम्ही विशेष कार्डचा वापर करून मोदक घेऊ शकता. तंत्रज्ञान आणि संस्कृतीला एकत्र घेऊन जाण्यासाठी एक प्रयत्न आहे.’