सोलापूर : कुटुंबातील रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारा अश्लाघ्य प्रकार सोलापुरात उजेडात आला आहे. अंगाखांद्यावर खेळलेल्या आठ वर्षांच्या मुलीवर चुलत्यानेच लैंगिक अत्याचार केले. संतापजनक बाब म्हणजे हा प्रकार माहीत असूनही पित्याने त्याची वाच्यता केली नाही. त्यामुळे चुलता आणि पिता या दोघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यापैकी बेजबाबदार पित्याला अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यासंदर्भात जेलरोड पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने धाव घेऊन आपला पती आणि दिराविरूध्द फिर्याद नोंदविली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. यात आणखी संतापजनक प्रकार घडला, तो म्हणजे पत्नीच्या पोटी एका पाठोपाठ एक तीन मुलीच जन्माला आल्यामुळे पती प्रचंड नाराज झाला. त्यातूनच त्याने अभागी पत्नी आणि पोटच्या तिन्ही मुलींना वा-यावर सोडले होते. त्यामुळे पीडित मुलीची आई आपल्या तिन्ही मुलींचा स्वतंत्रपणे सांभाळ करते. ती स्वतः एका खासगी कारखान्यात कामावर जाऊन आपला उदरनिर्वाह चालविते.

दरम्यान, पीडित मुलीचा चुलता अधुनमधून भावजयीच्या घरी यायचा. एकेदिवशी पीडित मुलीला त्रास जाणवू लागला असता आईने विचारपूस केली. तेव्हा पीडित मुलीवर चुलत्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्काप्रकार समोर आला.