वाई: पुणे – बंगळुरू महामार्गावरील सातारा पुणे मार्गावर खंबाटकी बोगद्यात आज (शुक्रवारी) पुन्हा मोटारीवर लोखंडी खांब पडल्याची घटना घडली. या घटनेत मोटारीचे माेठे नुकसान झाले.

बोगद्यातून पुण्याकडे जाणाऱ्या चालत्या मोटारीच्या बोनेटवर लोखंडी अँगल आदळल्याने चालक एकदम घाबरला. त्याने प्रसंगावधान राखून तातडीने गाडी एका बाजूला घेतली. या गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे.

Massive fire in building in Ghatkopar Mumbai
घाटकोपरमधील इमारतीला भीषण आग, १३ जण गुदमरले; रुग्णालयात उपचार सुरू
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
python, CBD police station, snake,
VIDEO : अबब..! आठ फुटी अजगर… तक्रारदारप्रमाणे धडकला पोलीस ठाण्यात, एकच धावपळ
Bhamragad rain, Gadchiroli,
गडचिरोली : पुरस्थिती! मुसळधार पावसामुळे भामरागडचा संपर्क तुटला, ५० कुटुंबे…
woman stabbed drunken husband to death in sinhagad road area
मद्यपी पतीचा चाकूने भोसकून खून; नऱ्हे भागातील घटना
ST bus washed away in flood water in Parbhani
परभणी : पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून, मानवत तालुक्यातील घटना
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
Chira Bazaar, wall collapses Chira Bazaar,
मुंबई : चिराबाजारात संरक्षक भिंत पडून दोन मृत्यू, एक जखमी

हेही वाचा… राजकीय दबावातून ईडी कारवाई झाली का? राजमल लखीचंद ज्वेलर्सचे ईश्वरलाल जैन यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

बुधवारी एका ट्रकवर लोखंडी अँगल कोसळून अपघात झाला होता. त्यानंतर आज पुन्हा गाडीवर लोखंडी खांब कोसळला. प्रकाशासाठी लावण्यात आलेले खांब मोटारी व ट्रक वर पडत असल्याने वाहनचालकांनी चिंता व्यक्त केली आहे.

हेही वाचा… भाजपाचं ‘दुकान’ जोरात, पण नवीन ग्राहकच जास्त! स्वपक्षाच्या सद्यस्थितीवर नितीन गडकरींचा मार्मिक टोला

दरम्यान आज प्रशासनाने बोगद्याची पाहणी केली. दुपारपासून सायंकाळ पर्यंत बोगद्यात दुरुस्तीचे काम करण्यात आले. सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे खंबाटकी बोगदा मार्गे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहेत. हलक्या वाहनांकरिता पर्यायी मार्ग खंबाटकी घाट मार्गे आहे. जड वाहनांकरिता पुणे बाजूकडे जाणारी सर्व वाहतूक नमूद वेळेत पूर्णपणे बंद करण्यात आली होती. महामार्गावर उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम व भुईंजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.