सांगली : विषारी घोणस जातीच्या अळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आढळून आला असून रविवारी कडेगाव तालुययातील अंबक येथील तरूणींला या अळीचा दंश झाला आहे. असह्य वेदना होउ लागल्यानंतर तिला कडेगावच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.अंबक येथील शेतातील वस्तीवर राहत असलेली तरूणी आश्‍विनी नंदकुमार जगदाळे (वय २०) ही रविवारी दुपारी घराबाहेर उन्हात सुकण्यासाठी दोरीवर टाकलेले कपडे काढत असताना गवतामध्ये अळीचा तिच्या पायांना स्पर्श झाला.

हेही वाचा : येत्या ५ दिवसांत राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

यामुळे तिला विषबाधा झाली. विषबाधेमुळे तिला पायावर पुरळ उठून सूज आली. याबरोबरच असह्य  वेदनाही सुरू झाल्या. तिला तातडीने स्थानिक रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर या तरूणीला पुढील उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.मुलीला उपचारासाठी नेत असताना तिच्या आईने गवतात  सापडलेली अळी प्लास्टिक पिशवीतून दाखविण्यासाठी आणली होती. केसाळ असलेली ही अळी म्हणजे विषारी घोणस जातीची अळी असल्याचे सांगण्यात आले असले तरी याबाबत तज्ञांकडून खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र, घोणस अळीचे जिल्ह्यात अस्तित्व समोर आल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

Story img Loader