साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात येत आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात उपस्थित आहेत. असे असतानाच आता हिंदू महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी राज्यातील स्वराज्याचे शत्रू असलेल्या औरंगजेब आणि अफजलखानाच्या कबरी नेस्तनाबूत करून टाकाव्यात, अशी मागणी केली आहे. राज्य सरकारने या कबरी उद्ध्वस्त केल्या नाही, तर हे काम हिंदू महासंघ करेल, असे आनंद दवे म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> साताऱ्यात अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात, प्रतापगडाच्या पायथ्याशी चोख बंदोबस्त

“मागील अनेक दिवसांपासून आम्ही अफजलखानाच्या कबरीभोवतीचे अतिक्रमण काढले गेले पाहिजे, अशी मागणी करत होतो. अफजलखानासारख्या राक्षाला दैवत्व देण्याचे काम काही समाजकंटक करत होते. ही कबर काढण्याचे पुण्याचे काम राज्य सरकार करत आहे. औरंगजेब, अफजलखान यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला. हिंदुंना त्रास दिला. हिंदुंची मंदिरं तोडली. त्यामुळे त्यांच्या कबरी राज्यात कशाला हव्यात?” असा सवाल आनंद दवे यांनी केला.

हेही वाचा >> ‘तुम्ही काय गुंड आहात का? हा हलकटपणा…’, प्रेक्षकांना मारहाण करत चित्रपटगृहाबाहेर काढलं जात असल्याने शरद पोंक्षे संतापले

“अफजलखान तसेच औरंगजेब यांच्या कबरींना उद्ध्वस्त करून टाकावे. सरकारने हे काम करावे. सरकारला हे जमत नसेल तर हिंदू महासंघ हे काम करेल. स्वराज्याच्या शत्रूचे काय हाल होतात, हे दिसले पाहिजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखान तसेच इतरांच्या कबरींना जागा दिली. मात्र अफजलखानाच्या वंशजांनी, त्याच्या नातेवाईकांनी तसेच त्याच्या भक्तांनी हिंदुस्तानावर तसेच हिंदूंवर प्रेम केलेले नाही. याच कारणामुळे मला वाटतंय की या कबरींची आता गरज नाही. सर्वांना इतिहास पाठ झालेला आहे,” अशी भूमिका आनंद दवे यांनी मांडली.

पाहा व्हिडीओ –

नेमके प्रकरण काय?

हेही वाचा >> मोदींनी महाराष्ट्रातील युवकांचे भवितव्य हिरावले; उद्योगधंदे राज्याबाहेर जात असल्याबद्दल राहुल गांधी यांची टीका

अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती. न्यायालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई आज (१० नोव्हेंबर) पहाटेपासून सुरु केली आहे. अफजलखान कबरीच्या परिसरात उरूसही भरविण्यास सुरवात झाली होती. हे अनधिकृत बांधकाम हटवले जात असताना प्रतापगड, महाबळेश्वर,वाई, कराड, सातारा येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand dave demands removal of afzal khan and aurangzeb memorial prd
Show comments