डॉ. अमरेश मेहता यांचा ‘पॉवर ऑफ मंत्रा’ नावाचा जाहीर कार्यक्रम सांगलीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मंत्राचा वापर करून आवडत्या व्यक्तीला आकर्षित करण्यापासून प्रजनन क्षमता वाढवण्यापर्यंत गोष्टी करण्याचे अनेक दावे केले आहेत. या कार्यक्रमाला अंनिसने शुक्रवारी (१५ एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन आक्षेप घेतला.

‘पॉवर ऑफ मंत्रा’चे नेमके दावे कोणते?

डॉ. मेहता यांनी आपल्या व्हिडीओमध्ये मंत्र सामर्थ्याचे अनेक दावे केले आहेत. यात प्रजनन क्षमता व नि:संतानासाठी, त्वचारोग, गर्भ रक्षेसाठी, काळी जादू व नजर लागणे यासाठी, आवडती व्यक्ती आकर्षित करण्यासाठी मंत्र वापरावा या दाव्यांचा समावेश आहे. तसेच मंत्र म्हटल्याने ५० टक्के मार्क मिळविणारे ९० टक्के मिळवतात, मेमरी वाढते, मतिमंदाची बुद्धी ८० टक्के सुधारते, उच्च रक्तदाब नियंत्रित होतो, थायरॉईड दुरुस्त होते, असेही अनेक अवैज्ञानिक दावे केले जात आहेत. मात्र, मंत्र-तंत्र विद्या ही अवैज्ञानिक संकल्पना असल्याची भूमिका अंनिसने घेतली आहे.

Scientist Rahul Damale selected for Netaji Subhash ICAR International Fellowship
वडील तिसरी उत्तीर्ण तर आई निरक्षर, मुलगा शास्त्रज्ञ झाला, आता परदेशी शिक्षणासाठी निवड
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Hindu Bahujan mahasangh
नागपूर : अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा विषय तापला, हिंदू बहुजन महासंघाचा इशारा
shakti kapoor
“माफी मागितली…”, शक्ती कपूर यांच्याबरोबर लग्न करण्यासाठी शिवांगी कोल्हापूरेंनी सोडलेले करिअर; अभिनेते म्हणाले, “त्या गोष्टीचा तिला खूप…”
portfolio, investment , Alphaportfolio Concept ,
चला अल्फापोर्टफोलिओ तयार करूया
Fund Jigyaza Wealth Creation Through SIP
फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
बारामतीत कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून नाराजी नाट्य; खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
cm Devendra fadnavis loksatta
महाकालीचे दर्शन शुभसंकेत, ठरवल्यापेक्षा मोठे काम होणार – फडणवीस

अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, “सर्व धर्मातील मंत्र-तंत्र, विद्या या अंधश्रद्धा पसरविणार्‍या असतात. मंत्रात कोणत्याही प्रकारचे सामर्थ्य (पॉवर) नसते, असे अं.नि.स.चे मत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे त्यांना आम्ही आव्हान देत आहोत की, त्यांनी मंत्रांचे सामर्थ्य वैज्ञानिक नियमांच्या आधारे सिद्ध करावे.”

“शरीराभोवती आभामंडळ (ऑरा) असते, असे दावे छद्मविज्ञानात मोडतात. अशा मंत्रसामर्थ्याच्या सिद्धतेसाठी डॉ. मेहता यांनी नि:संतान स्त्री व पुरुष यांना मूल होणे सिद्ध करावे. मंत्र सामर्थ्याने त्यांनी दूर ठेवलेला पापड मोडून दाखवावा, दूर ठेवलेले पाणी गोड करून दाखवावे,” असं मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केलं.

डॉ. पाटील पुढे म्हणाले, “रविवारी होणार्‍या कार्यक्रमावेळी मंत्र सामर्थ्याच्या पॉवरला सिद्ध करण्यासाठी ज्या विज्ञानाचा वापर ते करतात त्या विज्ञानावर खुली चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत व त्यांनी त्यांच्या कार्यक्रमास आम्हा संधी द्यावी, अशी आम्ही विनंती करत आहोत.”

अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले, “आमचा कोणत्याही धर्माला विरोध नसून धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिकता पसरविणार्‍या कृत्यांना विरोध आहे.” डॉ. संजय निटवे म्हणाले, “शरीरात सात चक्रे असतात. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही व तसे सिद्धही झालेले नाही.”

हेही वाचा : “सरकार अपयशी ठरल्याने नागरिक बाबुजी देवस्थानातील बुवाबाजीच्या आहारी”, अकोला अपघातावर अंनिसची भूमिका

अॅड. धनंजय मध्वाना, अॅड. अजित सुर्यवंशी यांनी “मंत्र, तंत्र अशा अवैज्ञानिक व अंधश्रद्धा पसरविणार्‍या व आरोग्य सुधारून रोग बरे होतील असा दावा करणार्‍या सर्व आधुनिक मांत्रिकांवर कठोर कारवाई शासनाने करून रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळण्याचे थांबवावे”, असं मत व्यक्त केलं. या पत्रकार परिषदेस अंनिसचे कार्यकर्ते डॉ. प्रदीप पाटील, डॉ. संजय निटवे, बाळासाहेब पाटील, जगदीश काबरे, ज्योती आदाटे, त्रिशला शहा, आशा धनाले, तेजस्विनी सुर्यवंशी, प्रियांका तुपलोंढे, अॅड. धनंजय मध्वाना, फारुख गवंडी उपस्थित होते.

Story img Loader