आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीमातेचा जत्रोत्सव येत्या गुरुवार, दि. १४ फेब्रुवारीला आहे. या जत्रोत्सवात लाखो भक्तांचे आगमन होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडाभर नियोजन चालविले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच आमदार, खासदार, मंत्री मोठय़ा प्रमाणात या उत्सवास उपस्थित राहणार आहेत. मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीमातेच्या जत्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. खास रेल्वे सोडूनही भाविकांची सोय करण्यात आली आहे. मुंबई व ठाणे महापालिकेचे नगरसेवकही या जत्रोत्सवास उपस्थित राहतात. आंगणेवाडीच्या भराडीमातेच्या दर्शनाला सुमारे १५ ते २० लाखांपर्यंत भाविकांची उपस्थिती लाभते. त्यामुळे देवस्थान समिती व प्रशासनाने दर्शनासाठी खास सुविधा निर्माण केल्या आहेत. या दोन दिवसांच्या जत्रोत्सवात लाखो लोक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेत असतात.
आंगणेवाडी श्री देवी भराडीमातेचा जत्रोत्सव १४ फेब्रुवारीला
आंगणेवाडीच्या श्री देवी भराडीमातेचा जत्रोत्सव येत्या गुरुवार, दि. १४ फेब्रुवारीला आहे. या जत्रोत्सवात लाखो भक्तांचे आगमन होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आठवडाभर नियोजन चालविले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच आमदार, खासदार, मंत्री मोठय़ा प्रमाणात या उत्सवास उपस्थित राहणार आहेत. मालवण
First published on: 12-02-2013 at 04:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anganewadi shree devi bharididevi jatra utsav in on 14th feb