Bharadi Devi Jatra Anganewadi Sindhudurg : कोकणातील प्रति पंढरपूर या नावाने ओळखली जाणारी आंगणेवाडीची जत्रा कधी होणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच या यात्रेची तारीख जाहीर झाली आहे. आंगणेवाडीची जत्रा महाराष्ट्रातल्याच नाही तर देश-विदेशातल्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. आंगणेवाडीच्या जत्रेत लाखो भाविक गर्दी करत असतात. मालवणच्या मसुरे गावातील आंगणेवाडी या ठिकाणी असलेल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. तसंच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचीही या यात्रेत उपस्थिती असते.

नवसाला पावणारी देवी असा भराडी देवीचा लौकिक

मसुरे गावात आंगणेवाडी नावाच्या वाडीत असणाऱ्या भराडी देवीची ख्याती महाराष्ट्रभरात आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीचा लौकिक आहे. भरडावर देवी प्रकट झाल्याने या देवीचं नाव भराडी देवी असं ठेवण्यात आलं. भराड म्हणजे माळरान, या देवीच्या मंदिराच्या आजूबाजूला असलेला परिसर हा माळरान आहे त्यामुळेच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं.

yogi Adityanath told mahavikas aghadi problem
काँग्रेस आघाडी ‘समस्या’; तर भाजपा महायुती ‘समाधान’ – योगी आदित्यनाथ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rajnath Singh, Shivajinagar candidate Siddharth Shirole,
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांना घेऊन काँग्रेस बुडणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची टीका
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
Asaduddin Owaisi Bhiwandi Constituency, Waris Pathan,
मोदी हे भारतातील मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणणार, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आरोप
Fear of division in Teli community due to the candidates given by sharad pawar and ajit pawar
पवार काका पुतण्यांनी दिलेल्या उमेदवारांमुळे तेली समाजात फूट पडण्याची भीती

नवसाला पावणारी देवी असा भराडी देवीचा लौकिक

आंगणेवाडीतल्या आंगणे कुटुंबाची ही देवी आहे. मात्र नवसाला पावणारी देवी असा देवीचा लौकिक आहे. त्यामुळे लाखो लोक या देवीच्या यात्रेला येतात. येत्या वर्षात २ मार्च २०२४ या दिवशी आंगणेवाडीची यात्रा भरणार आहे. या देवीचं दर्शन सगळ्यांसाठी खुलं असतं. मागच्या वर्षी या देवीच्या यात्रेला सात लाख भाविकांची उपस्थिती होती. यावर्षी ही संख्या आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. कोकणवासीयांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या जत्रेला यंदाही राजकीय मंडळी उपस्थिती दर्शवतील. या यात्रेत कोण कोण येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात. दरवर्षी सुमारे पाच ते सात लाख भाविक भराडी देवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. आंगणेवाडीच्या भराडी देवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो.