धाराशिव : दुभती गाय चोरीला जावून पाच महिने झाले, तरी तीचा शोध लागत नसल्याने संतप्त पशुपालक शेतकऱ्यांने बुधवारी धाराशिव जिल्ह्यातील लोहारा पोलिस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, पोलिसांनी १२६ कलमान्वये  पशुपालक शेतकऱ्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. माकणी (ता. लोहारा) येथील नागनाथ गणपती शिंदे शेती करतात. सरकारचे चुकीचे धोरण आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतीव्यवसाय अडचणीत आला आहे.

हेही वाचा >>> अक्कलकोटजवळ मोटार आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू , देवदर्शनासाठी गाणगापूरला जाताना काळाचा घाला

Thane Anti Corruption Bureau arrested senior clerk for demanding two percent to clear dues
लाचेप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपीक अटकेत
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई
Bangladeshi infiltrators Dhule, Four Bangladeshi infiltrators arrested, Bangladeshi infiltrators,
धुळ्यातून चार घुसखोर बांगलादेशी ताब्यात
Mahabaleshwar Revenue takes strict action against unlicensed mining satara news
विनापरवाना उत्खननावर महाबळेश्वर महसूलची धडक कारवाई
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?

शेती व्यवसायावर घरप्रपंच चालवणे मुश्किल झाल्यामुळे शिंदे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून चार गायी घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला. यातून घरखर्चाला हातभार लागत होता. परंतु, गेल्या पाच महिन्यापूर्वी शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या दुभती गाय चोरीला गेली. याबाबत पोलिसांत रितसर तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी गायीचा शोध घेतला नसल्याने पशुपालक शेतकरी शिंदे यांनी पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करून पोलिस प्रशासनाचे लक्षवेधून घेतले होते. तरीही पोलिसांनी गायीच्या तपासाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त झालेल्या पशुपालक शेतकरी शिंदे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार शिंदे हे बुधवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास लोहारा पोलिस ठाण्यासमोर पेट्रोलच्या तीन बाटल्या घेऊन आले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक विनोद जोकार यांनी शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>> BJP : शरद पवार-अजित पवार एकत्र येण्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाची ना…”

मात्र, ते आत्मदहन करण्यावर ठाम राहिले. दरम्यान, शिंदे हे अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस निरीक्षक अजित चिंतले घटनास्थळी आले.  त्यांनी शिंदे यांना धमकावत व बळाचा वापर करून शिंदे यांना आत्मदहनापासून रोखले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी पशुपालक शेतकरी शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता १२६ कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Story img Loader