Tatkare vs Gogawale over Raigad Guardian Minister : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये धूसफूस चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केल्यानंतर काही नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना (शिंदे) नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं नसल्यामुळे त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले इच्छुक होते. मात्र, रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. मात्र, रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष चालू आहे. रायगडमधील शिवसेनेचे इतर आमदारही गोगावले यांच्याबरोबर आहेत.

“नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खासदार सुनील तटकरे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी काम केलं नाही, रायगडमधील शिवसेनेच्या (शिंदे) तिन्ही विद्यमान आमदारांना पाडण्याचा प्रयत्न केला”, असा आरोप रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. तसेच गोगावले म्हणाले, “पालीच्या बल्लाळेश्वराच्या मंदिरात जाऊन शपथ घेण्यासही मी तयार आहे”. यावर आता सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “माझी देखील कोणत्याही मंदिरात जायची तयारी आहे. पालीचा बल्लाळेश्वर, हरिहरेश्वर, अलिबागच्या कनकेश्वर मंदिरात जायची माझी तयारी आहे. कारण आम्ही विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे महायुतीचं काम केलं आहे. अलिबागमध्ये महेंद्र दळवींसाठी, महाडमध्ये भरत गोगावले यांच्यासाठी काम केलं आहे. कारण लोकसभा निवडणुकीत या मंडळींनी प्रामाणिक काम केलं होतं. तसंच आम्ही विधानसभेला काम केलं. आम्ही आमची पूर्ण ताकद लावली होती”.

MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!
Omprakash Rajenimbalkar likely to join Mahayuti minister Pratap Sarnaik
“खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर महायुतीचेच!”, पालकमंत्र्यांकडून ‘ऑपरेशन टायगर’चे संकेत
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?

अनिकेत तटकरे काय म्हणाले?

दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांचा बेईमानांचा बादशाह असा उल्लेख केला होता. त्यावरही अनिकेत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. तटकरे म्हणाले, “खरंतर आमदार थोरवे यांचं अशा प्रकारचं बोलणं खूपच हास्यास्पद आहे. कारण तेच गद्दारांचे बादशाह आहेत, असं मी छातीठोकपणे सांगू शकतो. थोरवे यांचे स्वीय सहाय्यक निवडणुकीच्या वेळी श्रीवर्धनमध्ये काय करत होते, कशा प्रकारे शिवसैनिकांना चिथावणी देत होते, जे शिवसैनिक महायुतीचं काम करत होते त्यांना काय सांगत होते ते सगळं आम्ही बाहेर काढू. थोरवे यांनी निवडणुकीच्या काळात महायुतीला छेद देण्याचं काम केलं. झाकली मुठ सव्वालाखाची… मी देखील सर्व गोष्टी बाहेर काढू शकतो. निश्चितच सर्वांसमोर मांडू शकतो”.

Story img Loader