Tatkare vs Gogawale over Raigad Guardian Minister : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये धूसफूस चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. महायुती सरकारने पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केल्यानंतर काही नेत्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना (शिंदे) नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळालं नसल्यामुळे त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी भरत गोगावले इच्छुक होते. मात्र, रायगडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या तथा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलं होतं. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील वातावरण चांगलंच तापलं. त्यानंतर राज्य सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. आता या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. मात्र, रायगडमध्ये तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष चालू आहे. रायगडमधील शिवसेनेचे इतर आमदारही गोगावले यांच्याबरोबर आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा