Samit Kadam reacts on Anil Deshmukh Allegations: माजी गृहमंत्री व शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी देवंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांनी तीन वर्षांपूर्वी माझ्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार अशा विरोधातील अनेक नेत्यांवर खोटे आरोप करणारे आरोपपत्र दाखल करण्यासाठी दबाव आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. शिवाय त्याचे पुरावेही असल्याचं ते म्हणाले. समोरून देवेंद्र फडणवीसांनीही आपल्याकडे रेकॉर्डिंग असल्याचं म्हटलं आहे. यात अनिल देशमुख यांनी समीत कदम यांचं नाव घेतलं असून आता त्यांनीच अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीसांनी आपल्याकडेही देशमुखांच्या रेकॉर्डिंग्ज असून त्यांनी पुरावे जाहीर केल्यानंतर आपण त्या रेकॉर्डिंग्ज जाहीर करू, असं आव्हान दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांचा खास माणूस असणाऱ्या समीत कदम यांनीच एका बंद पाकिटात त्यांचा निरोप आपल्याला दिला, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भात समीत कदम यांचं नाव आता चर्चेत आलं आहे. आता समीत कदम यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Where are the modern Indian political thinkers says Yogendra Yadav
आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत आहेत कुठे?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
readers feedback on loksatta editorial
लोकमानस: या कारवाईने ओरखडाही येणार नाही
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Dharmendra
जावेद अख्तर यांच्याशी ‘तसं’ वागण्याचा धर्मेंद्र यांना आजही पश्चात्ताप; म्हणाले, “मला आश्चर्य वाटते…”
sushma andhare on ajit pawar
Sushma Andhare : “सुनेत्रा पवारांना उमेदवारी देऊन चुकलो”, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “वरातीमागून…”

काय म्हणाले समीत कदम?

समीत कदम यांनी अनिल देशमुख यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. “अनिल देशमुख यांनी चॅनलवर माझे व फडणवीसांचे फोटो दाखवले. यात नवीन काही नाहीये. त्यांनी माझे सोशल मीडियावरचेच फोटो दाखवले आहेत. काहीतरी फार मोठं शोधून काढल्यासारखं ते सांगत आहेत. हे फोटो वर्तमानपत्रातही आले आहेत”, असं समीत कदम म्हणाले आहेत.

Anil Deshmukh on Samit Kadam: “समीत कदम वाय सुरक्षा देण्याइतका महत्त्वाचा आहे का?”, अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाले, “त्यांचे घरोब्याचे…”

“आम्हाला एनडीएच्या बैठकांना बोलावलं जातं”

“२०१६ पासून जनसुराज्य शक्ती हा आमचा स्वतंत्र पक्ष आहे. मी त्याचा राज्याचा अध्यक्ष आहे. जेव्हा आम्ही एनडीएचे घटकपक्ष झालो, तेव्हा आम्हाला वेगवेगळ्या विषयांसाठी बैठकांचं, कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं जातं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज्यात होणार्‍या वेगवेगळ्या बैठकांसाठी आम्हाला बोलवलं जातं. त्यात देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच इतर पक्षीय नेत्यांचीही भेट होते. त्यात फार मोठं काहीतरी झालं असं सांगण्यात काही अर्थ नाही. मला तो काही फार मोठा विषय वाटत नाही”, असं म्हणत समीत कदम यांनी देशमुखांना उत्तर दिलं आहे.

anil deshmukh on samit kadam
अनिल देशमुख यांचा समीत कदम यांच्याबाबत मोठा दावा (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“अनिल देशमुखांना कदाचित विसर पडला असेल…”

“सांगली-मिरज काय, मी एका घटकपक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे. मला या राज्यातले सगळे नेते ओळखतात. अनिल देशमुख कदाचित विसरले आहेत. ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री असल्यापासून माझी त्यांच्याशी ओळख आहे. पण देवेंद्र फडणवीसांशी माझी नंतर ओळख झाली आहे. त्यामुळेच त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. ते वारंवार सांगत राहणं, यात मला अर्थ वाटत नाही”, असा दावाही त्यांनी केला.

“ते हे वारंवार सांगतायत याचा अर्थ तीन वर्षांनी हा विषय मांडून फक्त देवेंद्र फडणवीसांना निवडणुकीच्या आधी नुकसान पोहोचवण्याचा हेतू आहे. आता हा विषय रटाळ झालाय. अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय याशिवाय दुसरं काही बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांनी आरोप केला तसा कोणताही विषय नाही. त्यांनी माझी भेट घेतली. त्या दिवशी त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. एवढाच विषय होता. तीन वर्षं तुम्ही काय करत होतात?”, असा सवालही समीत कदम यांनी केला आहे.