Anil Deshmukh अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्यावरच्या हल्ला प्रकरणात चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटोल या ठिकाणी अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं आहे. घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास करणं सुरु आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे पोलिसांनी?

“काटोलमध्ये अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांच्यावर जो हल्ला झाला, ते प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं आहे. चार अज्ञातांविरोधात आम्ही हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी विशेष पोलीस निरीक्षकांनी भेट दिली आहे. तांत्रिक पुरावेही गोळा केले जात आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आहे. जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा-सुव्यवस्थेचा भंग करण्यात आला तर कठोर कारवाई केली जाईल.” अशी प्रतिक्रिया नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.

vitthal polekar murder
पुणे: अपहरणानंतर तासाभरात शासकीय ठेकेदाराचा निर्घृण खून, विठ्ठल पोळेकर खून प्रकरणात तिघे अटकेत; मुख्य सूत्रधार पसार
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Immediate relief, Nawab Malik, High Court,
नवाब मलिक यांना तूर्त दिलासा, मात्र….; वैद्यकीय जामिनावर असताना त्रासाविना प्रचार करत असल्याची उच्च न्यायालयाकडून दखल
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
police inspector corruption
प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

नेमकं काय घडलं?

काटोल मतदार संघात अनिल देशमुख  ( Anil Deshmukh Attack ) यांचा मुलगा सलील देशमुख हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदार संघात प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत अनिल देशमुख ( Anil Deshmukh Attack ) कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटलेल्या दिसून येतात. या संदर्भात नागपूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले. परंतु, अन्य तपशील देण्यास नकार दिला.

काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?

प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला ( Anil Deshmukh Attack ) केला.‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची ( Anil Deshmukh Attack ) सखोल चौकशी होऊन देशमुख यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध. अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.