Anil Deshmukh Attack : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख ( Anil Deshmukh Attack ) यांच्या कारवर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्यजवळ ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काटोल मतदार संघात सांगता सभा
काटोल मतदार संघात अनिल देशमुख ( Anil Deshmukh Attack ) यांचा मुलगा सलील देशमुख हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदार संघात प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत अनिल देशमुख ( Anil Deshmukh Attack ) कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटलेल्या दिसून येतात. या संदर्भात नागपूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले. परंतु, अन्य तपशील देण्यास नकार दिला.
भाजपाने केला स्टंटबाजीचा आरोप
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते रुग्णालयाजवळ एकत्र झाले होते. त्यामुळे तणाव ( Anil Deshmukh Attack ) निर्माण झाला होता. भाजपाने ही ‘स्टंटबाजी’ आहे, असा आरोप केला आहे. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपाचे काटोल मतदार संघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.
काय म्हटलं आहे सुप्रिया सुळेंनी?
प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला ( Anil Deshmukh Attack ) केला.ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची ( Anil Deshmukh Attack ) सखोल चौकशी होऊन देशमुख यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध. अशी पोस्ट सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हा हल्ला झाल्यानंतर अनिल देशमुखांना काटोलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशमुखांना झालेली जखम खोलवर झाली नाही असं डॉक्टरांचं म्हणणं नाही. देशमुखांवर सध्या उपचार सुरू आहेत. हल्ला करणारे हे भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप यावेळी जखमी झालेले अनिल देशमुख यांनी केल्याचं दिसतंय. ही दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.