Anil Deshmukh Big Claim on Eknath Shinde: राज्याच्या राजकारणात सध्या अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार यांच्यासह मविआमधील अनेक नेत्यांवर खोटे आरोप करणारी प्रतिज्ञापत्रं सादर करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर दबाव टाकला होता, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. एकीकडे देशमुखांनी आपल्याकडे पुरावे असल्याचं म्हटलं असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी हे आरोप फेटाळताना आपल्याकडेही रेकॉर्डिंग्ज असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांनी आज पत्रकार परिषदेत खळबळजनक विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अनिल देशमुख वि. देवेंद्र फडणवीस…

काही दिवसांपूर्वी अनिल देशमुखांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांवर दबावाचा आरोप केला. त्यासाठी समीत कदम नावाच्या व्यक्तीला बंद पाकिटात निरोप पाठवल्याचंही ते म्हणाले. त्यावर फडणवीसांसह महायुतीतील अनेक नेत्यांनी उपहासात्मक टीका केली आहे. त्यात खुद्द समीत कदम यांनी अनिल देशमुख यांचे आरोप फेटाळताना “त्यांचं डोकं फिरलंय एवढंच मी म्हणेन”, असं विधान केलं आहे. उलट अनिल देशमुखांनी त्यांना मदत करण्यासाठी आपल्याला भेटायला बोलावलं होतं, असा दावाही समीत कदम यांनी केला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस व समीत कदम यांच्यावर आरोप करणाऱ्या अनिल देशमुख यांनी आता आणखी एक मोठा दावा केला आहे. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी भाजपाशी युती केली व राज्यात सत्ताबदल झाला. पण देवेंद्र फडणवीसांनीच हे सगळं घडवून आणल्याचे दावे केले जात आहेत. पण एकनाथ शिंदे यांच्याआधी हा प्रयोग माझ्यावर झाला होता, असा दावा आता अनिल देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी फडणवीसांचा संदेश घेऊन आलेल्या व्यक्तीचं नाव सांगितलं आहे. (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार, त्यांचा मुलगा पार्थ पवार अशा नेत्यांवर खोटे आरोप करणारी प्रतिज्ञापत्रं लिहून दिली नाहीत, तर कारवाई होईल, असा दबाव देवेंद्र फडणवीसांनी टाकल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. त्याला नकार दिल्यामुळेच ईडी-सीबीआयची कारवाई आपल्यावर झाल्याचंही ते म्हणाले आहेत. मात्र, एकनाथ शिंदेंसारखा प्रयोग आपल्यावर सर्वात आधी झाला होता, असा त्यांनी केलेला दावा आता चर्चेचा विषय ठरला आहे.

“मी जर तेव्हा तसं प्रतिज्ञापत्र करून दिलं असतं तर उद्धव ठाकरे अडचणीत असते. आदित्य ठाकरेंना खोट्या आरोपांखाली त्यांनी तुरुंगात टाकलं असतं. लहान मुलांनाही घाणेरड्या राजकारणात ओढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक तर जेल में जाओ या बीजेपी में आओ हेच त्यांचं धोरण होतं”, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.

Samit Kadam on Anil Deshmukh: “अनिल देशमुखांचं डोकं फिरलंय”, समीत कदम यांची टीका; म्हणाले, “त्या दिवशी त्यांनी…”!

“…तर तेव्हाच उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं असतं”

“माझ्यावर तेव्हा प्रयोग यशस्वी झाला नाही म्हणून दुसरा प्रयोग एकनाथ शिंदेंवर केला. तो यशस्वी झाला. तिसरा प्रयोग अजित पवारांवर केला. तो यशस्वी झाला. माझ्यावरचा प्रयोग यशस्वी झाला असता, तर तेव्हाच उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं असतं”, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला आहे.

“बात दूरतक जाएगी”

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडेच्या रेकॉर्डिंग्ज जाहीर करण्याचा इशारा दिल्यानंतर त्यावर देशमुख यांनी सूचक विधान केलं आहे. “अभी बात निकलेगी तो दूरतक जाएगी. जोरो का झटका धीरेसे. योग्य वेळी सगळं बाहेर येईल. मी धमक्यांना घाबरत नाही. समित कदम काळा की गोरा हे मी कधी पाहिलं नव्हतं. तो पहिल्यांदा घरी आला तेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं. मी व्हिडीओ क्लिपिंग दाखवेन तेव्हा काय आहे ते सगळं कळेलच”, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.