राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना, सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार आणि वसुली प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुखांवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने हा जामीन मंजूर केला आहे. १०० कोटी वसुली प्रकरणामध्ये देशमुखांवर खोटे आरोप केल्याचा युक्तीवाद देशमुख यांच्या वकिलांनी केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यालयाच्या निकालावर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना भाजपावर टीका केली आहे.

“अनिल देशमुख यांना जामीन मिळाला याचे समाधान आहे. भाजपाच्या विखारी राजकारणाचे ते बळी आहेत. विरोधकांमध्ये भीती पसरविण्यासाठी १२० धाडी टाकल्या व आतच ठेवण्याचा प्रयत्न केला. खूनाच्या आरोपीला माफीचा साक्षीदार व नं १ ला संरक्षण हे गेल्या ८ वर्षांत देशातील विदारक चित्राचा भाग आहे.” असं सचिन सावंत यांनी ट्वीट केलं आहे.

हेही वाचा – Anil Deshmukh Bail : “अनेक घोटाळ्यांवरती किरीट सोमय्या जसे बोलतात आणि नंतर मात्र … ” – किशोरी पेडणेकरांचं विधान

याशिवाय, भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकण्यात आल्याच्या घटनेवरही सावंत यांनी मत व्यक्त केलं आहे. “शाई फेकून केलेल्या विरोधापेक्षा शाईने लिहून केलेला विरोध अधिक प्रभावी, व्यापक व लोकशाहीला अभिप्रेत असणारा असतो हे आंदोलकांनी लक्षात घ्यावे. शाई फेकण्याला जीवे मारण्याचा गुन्हा म्हणणे हे शाईफेकीला तात्विक आणि नैतिक आधार देते हे शासनाने लक्षात घ्यावे, कारवाई आणि बदला यात फरक असतो.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil deshmukh is a victim of bjps politics sachin sawants statement msr