Anil Deshmukh Targets Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनिल देशमुख व देवेंद्र फडणवीसांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब व अजित पवार यांच्याविरोधात खोटी प्रतिज्ञापत्रं सादर करण्याचा दबाव देवेंद्र फडणवीसांनी आपल्यावर आणल्याचा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केला होता. त्यावर फडणवीसांनीही आपल्याकडे त्यांचे रेकॉर्डिंग असल्याचं प्रत्युत्तर दिलं होतं. या दोघांमध्ये व पर्यायाने राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये यावरून कलगीतुरा रंगला आहे. त्यातच आता अनिल देशमुख यांनी फडणवीसांकडून आलेल्या माणसाचं नाव जाहीर केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अनिल देशमुखांचा नक्की आरोप काय?

अनिल देशमुख यांनी बुधवारी यासंदर्भात वृत्तवाहिन्यांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये गंभीर आरोप केले होते. “तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करून दिलं. त्यांनी माझ्याकडे एक लिफाफा पाठवला. त्यातल्या चार मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र करून देण्यास मला सांगण्यात आलं. ते जर मी करून दिलं असतं तर तेव्हा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार हे अडचणीत आले असते”, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक आगीतून फुफाट्यात? महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून माफी मागताना नवं वक्तव्य, म्हणाले…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “सुन लो ओवैसी…”, देवेंद्र फडणवीस यांचा एमआयएमला इशारा; म्हणाले, “काहीही झालं तरी…”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
devendra fadnavis criticize sanjay raut in nagpur
“संजय राऊतांसारख्या लोकांना मी…”, देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले, “ते माझ्या उंचीचे…”
Sanjay Raut
Sanjay Raut : “महायुतीला जिंकवण्यासाठी पोलीस व गुंडांच्या बैठका”, राऊतांचे आरोप; यादी देण्यास तयार, वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हणाले, “सरकार बदलल्यावर…”

Anil Deshmukh on Devendra Fadnavis: “आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला असा…”, अनिल देशमुखांचं मोठं विधान; देवेंद्र फडणवीसांवरही केले गंभीर आरोप!

“त्यांनी मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंवर मी खोटा आरोप लावायचा की त्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला पैसे जमवायला सांगितले. दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात आदित्य ठाकरेंवर असा आरोप लावायला सांगितलं की आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि तिला गॅलरीतून ढकलून दिलं”, असाही दावा अनिल देशमुख यांनी केला.

फडणवीसांची ‘ऑफर’ घेऊन आलेली व्यक्ती कोण?

दरम्यान, त्यावेळी अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांची ऑफर घेऊन कोण व्यक्ती आली होती? यावर भाष्य केलं नव्हतं. आता मात्र त्यांनी त्या व्यक्तीचं नाव जाहीर केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातलं वृत्त दिलं असून तिथे दिलेल्या प्रतिक्रियेत अनिल देशमुख यांनी संबंधित व्यक्तीविषयी माहिती सांगितली आहे.

Anil Deshmukh Shyam Manav: “..तर अनिल देशमुख यांनी आत्महत्या केली असती, त्यांनी…”, श्याम मानव यांचा दावा

“समित कदम असं त्या व्यक्तीचं नाव असून ही व्यक्ती मिरजमधील जनसुराज्य शक्ती पार्टीच्या युवक गटाची अध्यक्ष आहे. तेव्हा मी गृहमंत्री होतो. माझ्या शासकीय निवासस्थानी समित कदम आले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना माझ्याशी बोलायचंय असं सांगितलं. त्यानंतर समित कदम यांनी फडणवीसांना फोन लावून माझं त्यांच्याशी बोलणं करून दिलं”, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.

सहा वेळा समित कदम देशमुखांना भेटले!

दरम्यान, समित कदम आपल्याला आपल्या शासकीय कार्यालयात ५ ते ६ वेळा भेटले, असा दावाही अनिल देशमुख यांनी केला आहे. “समित कदम यांनीच त्या आरोपांचा ड्राफ्ट असलेलं पाकिट आणून दिलं होतं ज्यांचं प्रतिज्ञापत्र मी सादर करावं अशी त्यांची इच्छा होती. माझ्याकडे या चर्चेचं व भेटीचं व्हिडीओ फूटेजही आहे. योग्य वेळ आल्यावर मी ते जाहीर करेन”, असं सूचक विधान अनिल देशमुख यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय?

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांनीही प्रतिक्रिया दिल्याचं टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटलं आहे. “अनिल देशमुख फक्त गैरप्रचार करत आहेत. आधी त्यांनी दावे केलेले पुरावे त्यांना सादर करू देत. त्यानंतर मी माझ्याकडच्या सर्व क्लिप्स जाहीर करेन”, असं फडणवीसांनी म्हटल्याचं वृत्तात नमूद केलं आहे.