Maharashtra Assembly Election 2024 NCP Anil Deshmukh Attack : राज्याचे माजी गृहंमत्री आणि राष्ट्रवाद काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. काटोल मतदारसंघासोबत नागपूर व राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटल्या आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मतदानाच्या काही दिवसाआधी असा हल्ला होणे याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस क्षाचे राष्ट्री अध्यक्ष शरद पवार, पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. दरम्यान, त्यांना रुग्णालयातून आता सोडण्यात आले आहे. रुग्णालायतून बाहेर येताच त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

सोमवारी रात्री हल्ला झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळताच त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “माझ्यावर दगडं मारा किंवा गोळ्या झाडा अनिल देशमुख मरणार नाही. मी सगळ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.”

Aftab Poonawala, accused of Shraddha Walker's murder and dismemberment.
Lawrence Bishnoi Gang: बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर श्रद्धा वालकरचा मारेकरी; बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याची कबुली
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
telangana news
भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Raosaheb Danave kick viral Video
Raosaheb Danve Viral Video: रावसाहेब दानवेंची लाथ बसलेल्या कार्यकर्त्याची प्रतिक्रिया समोर; म्हणाला, “म्हणून साहेबांनी मला…”
Sadabhau Khot allegations
“…तेव्हा माझा एन्काऊंटर करण्याचा डाव होता”, सदाभाऊ खोत यांचा खळबळजनक आरोप!
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!

पोलिसांनी काय सांगितलं?

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरच्या हल्ला प्रकरणात चार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटोल या ठिकाणी अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं आहे. घटनास्थळी आढळलेल्या पुराव्यांच्या आधारे तपास करणं सुरु आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

हेही वाचा >> Anil Deshmukh Attack: भाजपला अनिल देशमुख यांच्यावरील हल्ल्यावर संशय का?

“काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्यावर जो हल्ला झाला, ते प्रकरण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं आहे. चार अज्ञातांविरोधात आम्ही हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी विशेष पोलीस निरीक्षकांनी भेट दिली आहे. तांत्रिक पुरावेही गोळा केले जात आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आहे. जनतेने कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा-सुव्यवस्थेचा भंग करण्यात आला तर कठोर कारवाई केली जाईल.” अशी प्रतिक्रिया नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

काटोल मतदार संघात अनिल देशमुख  ( Anil Deshmukh Attack ) यांचा मुलगा सलील देशमुख हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी देशमुख दिवसभर मतदार संघात प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत अनिल देशमुख ( Anil Deshmukh Attack ) कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटलेल्या दिसून येतात. या संदर्भात नागपूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले. परंतु, अन्य तपशील देण्यास नकार दिला.