सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे खळबळ माजली आहे. अशातच आता अनिल देशमुख यांच्याबाबत श्याम मानव ( Shyam Manav ) यांनी एक मोठा दावा केला आहे. अनिल देशमुख जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा ते इतके दबावात होते की आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत गेले होते असंही श्याम मानव यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत श्याम मानव? ( What Shyam Manav Said? )

“मविआ सरकारमध्ये मुंबई पोलीस आयुक्तांनी हे पत्र दिलं होतं की १०० कोटी रुपये महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गोळा करायला सांगितले. त्यानंतर त्या आधारावर एका नेत्याने अनिल देशमुख यांच्याकडे चार प्रतिज्ञापत्रं पाठवली. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही या चारही प्रतिज्ञापत्रांवर सही करा, तर तुम्हाला ईडी चौकशीला सामोरं जावं लागणार नाही. तसंच तुरुंगात जावं लागणार नाही.” असं श्याम मानव ( Shyam Manav ) म्हणाले.

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
soldier in Air Force committed suicide by shooting himself in head on duty
थरारक… वायुसेनेच्या जवानाची आत्महत्या, कर्तव्यावर तैनात असताना डोक्यात घातली गोळी अन्…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Bengaluru
Bengaluru : धक्कादायक! पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता पतीने गळफास घेऊन जीवन संपवलं; सुसाईड नोटमध्ये पत्नीवर केले गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO

हे पण वाचा- Shyam Manav: “ठाकरे पिता-पुत्रांना तुरुंगात धाडण्यासाठी अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव”, श्याम मानव यांचा आरोप

चार प्रतिज्ञापत्रांमध्ये काय होतं?

१) उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलवलं त्यांना पैसे गोळा करायला सांगितले या प्रतिज्ञापत्रावर सही करा.

२) दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात हा उल्लेख होता की आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. हा उल्लेख असलेल्या प्रतिज्ञापत्रावर सही मागितली.

३) तिसरं प्रतिज्ञापत्र अनिल परब यांच्याबाबत होतं, त्यांनी काही बेकायदेशीर बांधकामं आहेत त्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र आहे त्यावर सही करा.

४) चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवारांचा उल्लेख होता. अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावर बोलवलं. अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार उपस्थित होते. त्या दोघांच्या उपस्थितीत तुम्हाला (अनिल देशमुख) सांगण्यात आलं आहे की गुटखा विक्री करणाऱ्यांकडून इतके पैसे गोळा करायला सांगितलं आहे. अशा पद्धतीचं चौथं प्रतिज्ञा पत्र होतं. ही माहिती श्याम मानव यांनी दिली. तसंच ते म्हणाले अनिल देशमुख यांच्यावर इतका दबाव होता की त्यांनी आत्महत्या केली असती, असं श्याम मानव ( Shyam Manav ) म्हणाले

anil deshmukh
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर इतका दबाव होता की त्यांनी आत्महत्या केली असती असं श्याम मानव यांनी म्हटलं आहे. ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

अनिल देशमुखांबाबत काय म्हणाले श्याम मानव?

“अनिल देशमुख यांनी या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. अनिल देशमुखांवर इतका दबाव होता, कुटुंबाचा प्रश्न होता, त्यांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न होता. त्यांनी या प्रश्नी खूप विचार केला, त्यानंतर निर्णय घेतला की माझ्यामुळे तीन निरपराध माणसं तुरुंगात जातील, हे आपल्याला मान्य नाही. त्यावेळी ते अशा पर्यायापर्यंत आले होते की आत्महत्या करावी. पण त्यांनी सुदैवाने तसं पाऊल उचललं नाही. त्यांनी कुठल्याही प्रतिज्ञापत्रावर सही केली नाही. ज्यानंतर पुढील चौकशी केली आणि अनिल देशमुख यांना तुरुंगवास भोगावा लागला. अनिल देशमुख यांनीही हे सांगितलं आहे की ते आत्महत्या करण्याच्या विचारात होते. १०० टक्के हेच घडलं आहे की याची मला खात्री आहे.” असं श्याम मानव म्हणाले.

Story img Loader