राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने एका महिन्याच्या आत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील हे राज्यभर मराठा आरक्षणाबाबत जनजागृती करत आहेत. मनोज जरांगे पाटील हे ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करत उपोषणाला बसले होते. त्यांच्याबरोबर शेकडो मराठा आंदोलकही उपोषणाला बसले होते. या उपोषणकर्त्यांवर १ सप्टेंबर रोजी पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी अप्रत्यक्षपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केले. गृहमंत्रालयानेच पोलिसांना मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचे आदेश दिल्याचा दावा विरोधी पक्षांमधील नेत्यांनी केला होता. दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावरून माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“देवेंद्र फडणवीसांच्या संस्थेने मराठा आरक्षणाविरोधात…”, माजी आमदाराचा गंभीर आरोप
उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस ज्या संस्थेत आहेत त्या संस्थेने मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, असा आरोप धुळे शहराच्या माजी आमदाराने केला आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 15-10-2023 at 10:01 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil gote claims organization belongs devendra fadnavis petitions against maratha reservation supreme court asc