माजी मंत्री तथा शिवसेना नेते अनिल परब यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. त्यांनी बांधलेले रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा पैसा कोठून आला, असा सवाल विरोधक करत आले आहेत. असे असताना आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी याच रिसॉर्टबाबत मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचा आदेश दिला असून पुढील आठवड्यात ते पाडण्यात येईल, असा दावा सोमय्या यांनी केला. ते ‘ एबीपी माझा’ या मराठी वृत्तावाहिनीला बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “काल अजित पवार म्हणाले जालीम उपाय करा, आज एकनाथ शिंदे म्हणाले ठाण्यातील…” अधिवेशनात डान्स बारवरून जुगलबंदी

“काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशावर सही केली आहे. आता पर्यावरण मंत्रालयाकडे ही फाईल आहे. ते रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देणार आहेत. पुढच्या आठवड्यात जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. दिवाळीपर्यंत अनिल परब यांचे रिसॉर्ट इतिहासजमा होईल,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

हेही वाचा >> बीडीडी चाळीतील पोलिसांना आता १५ लाखांत घर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

तसेच, अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्यात येईलच. मात्र त्यासोबतच हे रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसे कोठून आले, याचीदेखील चौकशी होणार आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी करोना काळात झालेल्या मुंबईमधील कथित आर्थिक गैरव्यवहारावरही भाष्य केले. “मुंबई पालिकेने ३२ कोटी रुपये सुजित पाटकरच्या खात्यात जमा केले. त्यातील ४ कोटी ५७ लाख रुपये वरळी कोविड सेंटरचे होते. त्याचे पुरावे माझ्या वकिलाने आज न्यायालयात दिले. आज सुनावणीसाठी पोलीस नसल्यामुळे पुढील सुनावणी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. हे प्रकरण आता आझाद मैदान पोलीस ठाण्यापासून आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवले जाणार आहे,” अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

तसेच पुढच्या दोन ते चार दिवसांत सुजित पाटकर यांना अटक करण्यात येईल. ईडीआणि सीबीआयनेही या प्रकरणात लक्ष घालावं, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anil parab dapoli resort will be demolished soon said kirit somaiya prd