निवडणूक आयोगाने धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबत मोठा निर्णय घेत हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गटाला दोन वेगळी चिन्हे दिली जाणार आहेत. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दम्यान, याबाबत शिवसेना नेते अनिब परब यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय..,”धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
mla ashok pawar son kidnapped
Ashok Pawar: आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून दहा कोटींची खंडणी, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत

काय म्हणाले अनिल परब?

”निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे. त्याप्रमाणे आम्ही निडणूक आयोगाला तीन नावं आणि तीन चिन्ह देऊ आणि त्यापैकी जे चिन्ह मिळेल त्या जोरावर आम्ही निडणुकाही जिंकून दाखवू, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अनिल परब यांनी दिली आहे. “आज ज्या प्रकारचे राजकारण सुरू होते. त्यावरून हा निर्णय अपेक्षित होते. आयोगाने हा निर्णय तात्पुरता घेतला आहे. मात्र, अंतिम निकाल आमच्या बाजुनेच लागेल”, असेही ते म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नावाचाही करता येणार नाही वापर

निवडणूक आयोगाने काय दिली निर्णय?

दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही दोन्ही गट ठाकरे गट आणि शिंदे गट, अशी नावे वापरू शकतो. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटाला वेगळे चिन्ह देण्यात येईल, असेही निवडणूक आयोगायाने म्हटले आहे.